शनिवार, ३० ऑक्टोबर, २०२१

इयत्ता १२ वी कला २०२२-२३ विद्यार्थिनी हजेरी क्रमांक, जनरल रजिस्टर नंबर, नाव, आईचे नाव, जन्मतारीख, जातीचा प्रवर्ग, पत्ता इत्यादी माहिती

 

रयत शिक्षण संस्थेचे,

राधाबाई काळे महिला महाविद्यालय, अहमदनगर
शैक्षणिक वर्ष 2022-23
इयत्ता 12 वी कला तुकडी 'अ' आणि 'ब'
विद्यार्थिनी यादी 

वर्ग शिक्षक 12 वी कला 'अ' : श्री. अजय जाधव (9822348625)

वर्ग शिक्षक 12 वी कला 'ब' : श्री. रामदास मुंगसे (9881623043)


*College Roll No. : महाविद्यालयातील हजेरी, परीक्षा, प्रात्यक्षिक रेकॉर्ड, पर्यावरण जर्नल, प्रोजेक्ट इत्यादी ठिकाणी वापरावा.
*General Registration No. : एसटी पास, बोनाफाईड सर्टिफिकेट, स्कॉलरशिप अर्ज इत्यादी कामांसाठी

*सूचना :  विद्यार्थिनींनी त्यांचे English मधील नाव व आईचे नाव SSC गुणपत्रकाप्रमाणे तपासून पाहावे. मराठीतील स्वत:चे नाव, आईचे नाव व जन्मतारीख SSC शाळा सोडल्याच्या दाखल्याप्रमाणे तपासून पाहावी. Category तपासण्यासाठी Caste Certificate पाहावे. वरील यादीतील नाव हेच HSC गुणपत्रकावर येणार असल्याने विद्यार्थिनींनी काळजीपूर्वक माहिती तपासावी. काही बदल असल्यास तात्काळ वर्गशिक्षकांशी संपर्क करून योग्य ते पुरावे दाखवून बदल करून घ्यावा.


शनिवार, ११ सप्टेंबर, २०२१

विना-अनुदानित विज्ञान प्रवेश यादी

 

रयत शिक्षण संस्थेचे,

राधाबाई काळे महिला महाविद्यालय, अहमदनगर
शैक्षणिक वर्ष 2021-22
इयत्ता 11 वी विज्ञान
विना-अनुदानित प्रवेश यादी 

सूचना :

१. वरील प्रवेश दिनांक 11/09/2021 ते 14/09/2021 या कालावधीत सकाळी 11.00 ते सायं. 05.00 वाजेपर्यंत देण्यात येतील. मुदतीनंतर आलेल्या विद्यार्थिनींचा प्रवेशावर हक्क असणार नाही.

2. प्रवेशासाठी येताना दहावीचा शाळा सोडल्याचा दाखला, दहावी गुणपत्रक, आधार कार्ड, लागू असल्यास जातीचे प्रमाणपत्र, समांतर आरक्षणाचे प्रमाणपत्र/कागदपत्रे (कला, क्रीडा, सैनिक/माजी सैनिक/दिव्यांग) यांची मूळ कागदपत्रे व त्यांच्या प्रत्येकी 2 झेरॉक्स प्रती, 1 पासपोर्ट साईज फोटो आवश्यक


तिसरी प्रतिक्षा यादी

 

रयत शिक्षण संस्थेचे,

राधाबाई काळे महिला महाविद्यालय, अहमदनगर
शैक्षणिक वर्ष 2021-22
इयत्ता 11 वी विज्ञान
तिसरी प्रतिक्षा यादी 

सूचना :

१. वरील प्रवेश दिनांक 11/09/2021 ते 14/09/2021 या कालावधीत सकाळी 11.00 ते सायं. 05.00 वाजेपर्यंत देण्यात येतील. मुदतीनंतर आलेल्या विद्यार्थिनींचा प्रवेशावर हक्क असणार नाही.

2. प्रवेशासाठी येताना दहावीचा शाळा सोडल्याचा दाखला, दहावी गुणपत्रक, आधार कार्ड, लागू असल्यास जातीचे प्रमाणपत्र, समांतर आरक्षणाचे प्रमाणपत्र/कागदपत्रे (कला, क्रीडा, सैनिक/माजी सैनिक/दिव्यांग) यांची मूळ कागदपत्रे व त्यांच्या प्रत्येकी 2 झेरॉक्स प्रती, 1 पासपोर्ट साईज फोटो आवश्यक

3. विना-अनुदानित विज्ञान शाखेतील 120 जागांसाठी प्रवेश सुरु झाले आहेत. त्याची स्वतंत्र गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. 


सोमवार, ६ सप्टेंबर, २०२१

दुसरी प्रतिक्षा यादी

 

रयत शिक्षण संस्थेचे,

राधाबाई काळे महिला महाविद्यालय, अहमदनगर
शैक्षणिक वर्ष 2021-22
इयत्ता 11 वी विज्ञान
दुसरी प्रतिक्षा यादी 

सूचना :

१. वरील प्रवेश दिनांक 06/09/2021 ते 09/09/2021 या कालावधीत सकाळी 11.00 ते सायं. 05.00 वाजेपर्यंत देण्यात येतील. मुदतीनंतर आलेल्या विद्यार्थिनींचा प्रवेशावर हक्क असणार नाही.

२. जागा शिल्लक राहिल्यास प्रतिक्षा यादी क्रमांक 3  दिनांक 11/09/2021 रोजी प्रसिद्ध केली जाईल.

३. प्रवेशासाठी येताना दहावीचा शाळा सोडल्याचा दाखला, दहावी गुणपत्रक, आधार कार्ड, लागू असल्यास जातीचे प्रमाणपत्र, समांतर आरक्षणाचे प्रमाणपत्र/कागदपत्रे (कला, क्रीडा, सैनिक/माजी सैनिक/दिव्यांग) यांची मूळ कागदपत्रे व त्यांच्या प्रत्येकी 2 झेरॉक्स प्रती, 1 पासपोर्ट साईज फोटो आवश्यक

४. विना-अनुदानित विज्ञान शाखेतील 120 जागांसाठी प्रवेश अनुदानित प्रवेश संपल्यावर दिले जातील. महाविद्यालयाशी संपर्क साधावा.


गुरुवार, २ सप्टेंबर, २०२१

पहिली प्रतिक्षा यादी

 

रयत शिक्षण संस्थेचे,

राधाबाई काळे महिला महाविद्यालय, अहमदनगर
शैक्षणिक वर्ष 2021-22
इयत्ता 11 वी विज्ञान
पहिली  प्रतिक्षा यादी 

सूचना :

१. प्रवेश दिनांक 02/09/2021 ते 04/09/2021 या कालावधीत सकाळी 11.00 ते सायं. 05.00 वाजेपर्यंत देण्यात येतील. मुदतीनंतर आलेल्या विद्यार्थिनींचा प्रवेशावर हक्क असणार नाही.

२. जागा शिल्लक राहिल्यास प्रतिक्षा यादी क्रमांक 2  दिनांक 06/09/2021 रोजी प्रसिद्ध केली जाईल.

३. प्रवेशासाठी येताना दहावीचा शाळा सोडल्याचा दाखला, दहावी गुणपत्रक, आधार कार्ड, लागू असल्यास जातीचे प्रमाणपत्र, समांतर आरक्षणाचे प्रमाणपत्र/कागदपत्रे (कला, क्रीडा, सैनिक/माजी सैनिक/दिव्यांग) यांची मूळ कागदपत्रे व त्यांच्या प्रत्येकी 2 झेरॉक्स प्रती, 1 पासपोर्ट साईज फोटो आवश्यक

४. विना-अनुदानित विज्ञान शाखेतील 120 जागांसाठी प्रवेश अनुदानित प्रवेश संपल्यावर दिले जातील. महाविद्यालयाशी संपर्क साधावा.


शनिवार, २८ ऑगस्ट, २०२१

पहिली गुणवत्ता यादी

 

रयत शिक्षण संस्थेचे,

राधाबाई काळे महिला महाविद्यालय, अहमदनगर
शैक्षणिक वर्ष 2021-22
इयत्ता 11 वी विज्ञान
पहिली गुणवत्ता यादी 

सूचना :

१. प्रवेश दिनांक 28/08/2021 ते 01/09/2021 या कालावधीत सकाळी 11.00 ते सायं. 05.00 वाजेपर्यंत देण्यात येतील. मुदतीनंतर आलेल्या विद्यार्थिनींचा प्रवेशावर हक्क असणार नाही.

२. जागा शिल्लक राहिल्यास प्रतिक्षा यादी क्रमांक 1  दिनांक 02/09/2021 रोजी प्रसिद्ध केली जाईल.

३. प्रवेशासाठी येताना दाखला, दहावी गुणपत्रक, आधार कार्ड, लागू असल्यास जातीचे प्रमाणपत्र, समांतर आरक्षणाचे प्रमाणपत्र/कागदपत्रे (कला, क्रीडा, सैनिक/माजी सैनिक/दिव्यांग) यांची मूळ कागदपत्रे व त्यांच्या प्रत्येकी 02 झेरॉक्स प्रती, 01 पासपोर्ट साईज फोटो आवश्यक

४. विना-अनुदानित विज्ञान शाखेतील 120 जागांसाठी प्रवेश अनुदानित प्रवेश संपल्यावर दिले जातील. महाविद्यालयाशी संपर्क साधावा.


गुरुवार, २६ ऑगस्ट, २०२१

इयत्ता 11 वी विज्ञान सर्वसाधारण गुणवत्ता यादी

 

रयत शिक्षण संस्थेचे,

राधाबाई काळे महिला महाविद्यालय, अहमदनगर
शैक्षणिक वर्ष 2021-22
इयत्ता 11 वी विज्ञान
सर्वसाधारण गुणवत्ता यादी 

ज्या विद्यार्थिनींची गुणवत्ता यादीतील माहितीत दुरुस्ती असेल त्यांनी शुक्रवार दि. 27/08/2021 रोजी दुपारी 05.00 वाजेपर्यंत खालील मोबाईल क्रमांकावर प्रत्यक्ष संपर्क करायचा आहे. 

प्रा. काझी आय. व्ही.  7972197776
प्रा. पतंगे ए. बी.        7507586602 



शनिवार, १२ जून, २०२१

मानसशास्त्र विषय परिचय भाग - १

व्हिडिओ भाग १

अजय जाधव हे विद्यार्थ्यांना कला शाखेकडील मानसशास्त्र विषय परिचय करून देत आहेत. सोबत रयत शिक्षण संस्थेच्या राधाबाई काळे महिला महाविद्यालय, अहमदनगर येथील वैशिष्ट्ये सांगत आहेत.  #मराठी #मानसशास्त्र #aj_psy



Wear Your Face Mask

शुक्रवार, ११ जून, २०२१

संगीत विषयाचे महत्त्व!

संगीत  विषय शिक्षक श्री. कल्याण मुरकूटे सांगत आहेत संगीत विषयाचे महत्त्व!



Wear Your Face Mask

चरित्रात्मक लेखन

 कर्मवीर भाऊराव पाटील

- प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे 


कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शिक्षणप्रसाराच्या कामाला संपूर्ण भारतात तोड सापडणं कठीण आहे. आधुनिक महाराष्ट्राचे खरे शिल्पकार कोण असतील तर ते कर्मवीरच. ते प्रबोधनकारांना आपले गुरू मानत. कर्मवीरांच्या रयत शिक्षण संस्थेच्या पसा-याचा सारा आराखडा दादरच्या खांडके बिल्डिंगमधे तयार झालाय. कर्मवीरांचं पहिलं चरित्रही प्रबोधनकारांनीच लिहिलंय. ते आधी प्रबोधनमधे छापून आलं होतं. त्यातील छत्रपती शाहूंच्या एका उल्लेखामुळे त्यावेळी मोठा वादंग उडाला होता. सत्यशोधक भाऊराव पाटील यांचा अल्प परिचय...

महाराष्ट्रात भिक्षुकशाहीची सत्ता अजून बरीच वरचढ आहे. विशेषतः लोकशिक्षणाची दोन शस्त्रे – शिक्षणसंस्था व वृत्तपत्रे – ही सर्वस्वी भिक्षुकांच्या हाती जोपर्यंत आहेत, तोपर्यंत या सत्तेपुढे कोणाचेही काही शहाणपण चालणार नाही. गेली २५-३० वर्षे भिक्षुकी वृत्तपत्रांनी हजारो गारगोट्या हिरे म्हणून लोकांच्या गळ्यात बांधल्या. देशभक्त, राष्ट्रसेवक देवर्षि, महर्षि, तपस्वी, वीर, पीर, समाजभूषण, शिक्षणालंकार इत्यादी नाना प्रकराचे शेंदूर माखून त्यांनी शेकडो दगडधोंडे देव म्हणून गावोगावच्या नाक्यानाक्यां वर थापलेले आढळतात. या सवंग देवांच्या देवळात शेकडो स्वार्थी व लु च्च्या लोकांनी शिरकाव करून घेतला आहे व त्यावर त्यांनी आपल्या पोटापाण्याच्या वंगणाच प्रश्न अगदी बुळबुळीत रीतीने कायमचा सोडविलेला आहे. गेल्या १५ वर्षांत फंडगुंडगिरी ही एक बिनचूक देशोद्धारक यक्षिणीची कांडी जोरावर झाल्यामुळे तर हजारो भिक्षुकी गांधिलमाशा मधमाशांची रूपे पांघरून या ‘राष्ट्रीय’ पोळ्यावर गावोगाव घोंगावत असतात. भिक्षुकी वृत्तपत्रे म्हणजे वाटेल त्या क्षुद्राला कलमाच्या एकाच फटक्याने देवकळा देणा-या विश्वकर्म्याची मंदिरे बनली आहेत. भिक्षुकी पत्रांत मेलेला कोणता माणूस ‘सार्वजनिक कामात पडत ’ नसे ? गावोगावच्या पोराटोरांना माहीत असलेल शेकडो कु-हाडीचे दांडे भिक्षुकी कृपेने देशाचे देशपांडे म्हणून प्रतिष्ठितपणे मिरवत आहेत. बोलून चालून भिक्षुकशाही हाच मुळी एक भयंकर गांधिलमाशांचा पोळा ! मग त्यांच्या घोंगावण्याने जनतेची दिशाभूल का होणार नाही ? आणि हि-यांच्या भावाने गारगोट्या का विकल्या जाणार नाहीत ?

भगवंताने देशसेवेचा ताम्रपट भिक्षुकांनाच एकट्याला दिलेला नाही, त्यांच्या ब-या वाईट अभिप्रायावर जगण्या मरण्याची बळजबरी सुरू होणे शक्य नाही त्यांच्या कारस्थानाला कोणी कितीही बळी पडला, तरी तो जर अस्सल निष्ठावंत कर्मयोगी असेल, तर त्या कारस्थानाने त्यांचा रोमही वाकडा होणार नाही, भिक्षुकीशाहीच्या हाती शिक्षणप्रसार व वृत्तपत्राचे प्रचंड शिंगोडे असल्यामुळे त्यांना आपल्या भिक्षुकी गुंडगिरीचा ध्वनि जबरदस्त घुमविता येतो. परंतु तेवढ्यामुळे असे समजण्याचे मुळी गोष्टीच काही कारण नाही, की महाराष्ट्रात त्यांच्या कंपूशिवाय दुसरे कोमी मितभाषी एकनिष्ठ स्वार्थत्यागी देशसेवक व जनसेवक नाहीत. आहेत, ठिकठिकाणी निश्चयाने, एकनिष्ठेने आपापली विहीत कर्तव्ये मिटल्या तोंडी करणारी अनेक नररत्ने आहेत. ती शोधून काढून त्यांच्या कर्तबगारीचा आणि शीलाच्या कमावणीचा परिचय विवेकी महाराष्ट्रीयांना करून देणे प्रबोधनाचे कर्तव्य आहे. भिक्षुकांना आणि त्यांच्या पायतणाचे नाल बनलेल्यांना ही रत्ने गारगोट्या वाटली, तर ती त्यांच्या दृष्टीची पुण्याई समजून विवेकवादी जनांनी तिकडे दुर्लक्षच करणे श्रेयस्कर आहे. 

सातारचे भाऊराव पाटील हे नाव आजकाल भिक्षुकी कंपूत मोठ्या आचक्या दचक्याचे झाले आहे. सातारा जिल्ह्यातच काय पण अवघ्या महाराष्ट्रात हे नाव निघताच ब्राह्मणेतर जनतेत एका जोरदार चैतन्याचे वारे स्फुरण पाऊ लागते, टिळकी पुण्याईवर महाराष्ट्राच्या सर्व कारणी नेतृत्वाचे आसन फुकटाफाकट पटकविणा-या नरसोपंत केळकरांपासून तो थेट टिळकी कारस्थानांना बळी पडून हतप्रभ झालेल्या अच्युतराव कोल्हटकरापर्यंत असा एकही भिक्षुक सापडणार नाही की ज्याला भाऊराव पाटलांची कर्मयोगी कदर आणि बहुजन समाजावरील त्यांचे जिव्हाळ्याचे वजन माहीत नाही. कृतज्ञतेला पारखा न झालेला असा कोणता अस्पृश्य आहे की जो हे नाव ऐकताच या ‘या पाटील मास्तरा ’ विषयी आदरयुक्त भावनेने आनंदाश्रू ढाळणार नाही. सातारा जिल्ह्यात असा एकही शेतकरी नाही की भाऊरावाने ज्याच्या माजघरापर्यंत प्राथमिक शिक्षणाचे लोन नेऊन पोचविलेले नाही. ब्राह्मणेतर बहुजन – प्रबोधनाची अशी कही संस्था, चळवळ, परिषद, सभा, जलसा, व्याख्यानमाला, जत्रा किंवा शाळा आढळणार नाही की जीत भाऊराव पाटलांचे श्रम खर्ची पडलेले नाहीत. इतकी सर्वस्पर्शी व सर्वव्यापी चळवळ करणारी ही व्यक्ति कोण आहे, कशी आहे. कसल्या ध्येयाच्या मागे लागलेली आहे. इत्यादी सर्व तपशील महाराष्ट्रापुढे मांडण्याचा मान प्रथमतः प्रबोधनलाच मिळत आहे, हे या कलमाचे भाग्य होय, भाऊरावांचे चरित्र म्हणजे तरुण महाराष्ट्राला जितके हद्यंगम तितकेच ते आत्मप्रबोधक वाटेल, अशी आशा आहे. आमची अशी खात्री आहे की, भाऊराव जर ब्राह्मण असते, निदान भटाळलेले असते, तर भिक्षुकशाहीने त्यांना जला आकाशापेक्षाही उंच उचलून धरले असते.

घराणे आणि पूर्वसंस्कार

भाऊरावांची जन्मभूमी. यांचे घराणे तेथले वतनदार पाटील हे जैन धर्मी असून जात चतुर्थ. हे पाटील घराणे बरेच मोठे असून यांच्या नातेवाईकांच्या शाखा व उपशाखा विस्तृत पसरलेल्या आहेत. पिढ्यान पिढ्या चालत आलेला मुख्य धंदा शेतकी. अर्थात शेतकीशी सहकार्याने राहण्यास साठवलेल्या अक्षरशत्रुत्वाचाही पगडा या ऐतवडेकर पाटलावर बराच असे. परंतु भाऊरावांचे वडील पायगोंडा पाटील यांनी मराठी ७वी यत्तेची परीक्षा देऊन सरकारी नोकरी धरली. साक्षर होऊन सरकारी नोकरीत प्रवेश करणारे है जैनातील पहिलेच गृहस्थ. यांना २० रुपये पेन्शन मिळत असे. खुद्द भाऊरावच्या वंशावळीतले दोन पूर्वज सर्वज्ञानसंपन्न व सर्वसंगपरित्याग करून जिनसेन (जैनांचे जगद्गुरू) झाले होते. कमाल स्वार्थत्यागाची, शिक्षणज्ञानाची आणि बहुजन सेवेची भाऊरावांची जी प्रवृत्ती आज पूर्णत्वाने परिमत झालेली स्पष्ट दिसत आहे, तिचा उगम या पूर्व संस्कारातच आढळून येतो. भाऊरावांचे शिक्षण तासगांव, दहिवडी, विटे व कोल्हापूर वगैरे मॅट्रिकपर्यंत झालेले आहे. विद्यार्थी दशेतच त्यांना तालमीचा नाद लागला व ते सर्व ठिकाणी बंडखोर विद्यार्थी म्हणून प्रसिद्ध असत. लहानसहान हक्कासाठी सामोपचाराचे सर्व प्रयत्न हरल्यावर गुंडगिरीची लाठी फिरवण्याचा प्रसंग आलाच, तर पहिला रामटोल्या भाऊरावचा असे. अमुक गोष्ट अन्यायी आहे एवढे त्यांना पटले की त्याविरुद्ध शक्य त्या रीतीने दंडुकेशाही चालविताना ते कोणाचीही व कशाचीही दरकरार बाळगीत नसत. 

लहानपणापासूनच त्यांना लोकसंग्रहाची मोठी आवड आणि त्यांच्या सवंगड्यात शेतक-यांची व महार मांगादी अस्पृश्यांची मुले यांचा भरणा विशेष असे. स्पृश्यअस्पृश्य भेदाचा जुलमी वेदोक्तपणा त्यांना आपल्या विद्यार्थी दशेतच अटकळीत आणून त्याविरूद्ध शक्य तेवढा निकराचा विरोध करण्याचा उपक्रम चालू ठेवला होता. आपल्या अस्पृश्य मित्रांना सार्वजनिक विहिरीवर आणि पाणवठ्यावर लोक का येऊन देत नाहीत ; याचा बालभाऊरावला प्रथम प्रथम काही उलगडाच होईना ! पुढे खुलासा झाला की हिंदू धर्माची आज्ञाच तशी कडकडीत आहे. एका विहिरीवर ते आपल्य एका अस्पृश्य मित्रासह पाणी प्यावयास गेले. लोकांनी मित्राला मज्जाव केला. भाऊराव म्हणाले, ‘या विहिरीवर आम्ही दोघेही पाणी पिणार. पिऊन देत नसाल तर मी तुम्हालाही पाणी काढून देणार नाही. ’ गोष्ट हमरी तुमरीवर आली. तालीमबाज भाऊरावाने कडाड एका हिसक्याने विहिरीचे रहाटचाक उचकून मोडले आणि दिले दूर भिरकावून.  ‘काढा लेकाच्यानो कसे पाणी काढतो ते ! म्हणे आमचा हिंदूधर्म. उभा तिवाठ्यावर जाळला पाहिजे असला धर्म. ’ 

भाऊरावचा आजचा कडवा सत्यशोधक बाणा, अल्पवयातल्या असल्या प्रत्यक्ष सत्यशोधनांनी बनलेला आहे. सन १९०२ ते १९०८ पर्यंत इंग्रजी शिक्षणासाठी ते कोल्हापुरात जैन बोर्डिंगमध्ये रहात असत. तेथेही त्यांची बंडखोर प्रवृत्ती वाढत्या प्रमाणावर होती. विवेकाला ज्या गोष्टी पटायच्या नाहीत त्यांचा ठिकठिकाणी निषेध करायला भऊराव कधीच कचरत नसत. १९०६ सालापर्यंत कोल्हापुरची नेटिव जनरल लायब्ररी म्हणजे संपूर्ण भटाळलेली असे. मॅनेजिंग बॉडीत कजात सगळे ब्रह्मपुत्र. ही गोष्ट भाऊरावच्या नजरेस यायची. त्यांनी लागलीच आपल्या सवंगड्यांची सेना सज्ज करून, या भटी सवत्या सुभ्याला मोर्चे लावले व मॅ. बॉ. च्या इलेक्शनची संधी साधून गावात दांडगी चळवळ सुरू केली. शेकडो ब्रा म्हणेतरांना लायब्ररीचे मेंबर करून त्यांच्य बहुमताच्या जोरावर भटी सवत्यासुभ्याला कायमची मूठमाती दिली. या प्रसंग भाऊरावांच्या बरोबरीने रामभाऊ शिंदे या तरुणाने नेटाचा हल्ला चढवण्यात पुढाकार घेताल होता. हे आता बी.ए.एल.एल.बी. वकील होऊन साता-यास प्रॅक्टीस करीत असतात. 

याच वर्षी भाऊरावला आणखीन एका विवेक अमान्य गोष्टीबद्दल बंड करावे लागले. प्रो. अण्णासाहेब लठ्ठे हे जैन बोर्डिंगचे सुपरिटेंडंट होते. एका संध्याकाळी काही मुलांना दाढ्या करण्याची लहर आली. पण ते धर्मबाह्य कृत्य म्हणून बोर्डिंगच्या नियमाविरुद्ध होते. भाऊराव म्हणाले,  ‘असला कसला हा नियम आणि हा धर्म ? सकाळी दाढी केली तर पुण्य ? संध्याकाळी केली तर पाप ? काय या पाप पुण्याच्या आचरट कल्पना बुवा. बस्स. प्रथम मी दाढी करणार नरकात गेलो तरी बेहत्तर !’ भाऊरावाबरोबर ५-६- मुलांनीही दाढी विधी उरकला. सुप. लठ्ठे यांना ही गोष्ट कळताच, त्यांनी गुन्हेगारांना बोलावून त्यांची हजेरी घेतली व शिस्त मोडल्याबद्दल चार-चार आणे दंड ठोठावला. बाकीच्या सर्व मुलांनी दंड भरला पण भाऊरावाने साफ नाकारले. तुमच्या बोर्डिंगची शिस्त मी मोडली असेल तर मला बोर्डिंगातून डिसमिस करा. संध्याकाळी दाढी केली म्हणून काय आकाश कोसळून पडले ? का धर्म बुडाला ? दाढ्या आम्ही स्वतः आणि त्याचा डबल चार्ज तुम्हाला काय म्हणून ? सुप. लठ्ठे यांनी अर्थात भाऊरावांची बोर्डिंगातून उचलबांगडी केली. 

तेथून निघताच, महाराजांचे मेहुणे मामासाहेब खानविलकर यांनी आपले चिरंजीव बाळासाहेब यांचे कॅम्पनियन म्हमून भाऊरावांची राजवाड्यात सर्व व्यवस्था लावली. तेथे ते दोन वर्ष होते. या अवधीत त्यांचा सारा आयुष्यक्रम सरदारांच्य ा मुलांच्या श्रीमंती सहवासात गेल्यामुळे, बालपणातील गोरगरीब मित्रांच्या जीवनाकडे तुलनेने पाहण्याची त्यांची सत्यशोधक प्रवृत्ती अत्यंत चिकित्सक व न्यायनिष्ठूर बनली. त्यावेळी कोल्हापूरात शेणोलीकर मास्तर असत, ते भाऊरावची तरतरीत बुद्धी, कडवा बाणेदारपणा आणि तत्त्वनिष्ठा पाहून फार खूष झाले, ते दररोज भाऊरावला खाजगी मोफत शिकवीत असत. त्यांच्य उपदेशाचा भाऊरावच्या शीलकमावणीवर दीर्घ परिणाम झाला. याच सुमारास शाहू महाराजांच्या प्रेरणेने लठ्ठे, जाधव, डोंगरे प्रवृत्तीने सत्यशोधक समजाच्या पुनर्घटनेचे प्रयत्न चालू केले आणि महाराजांनी खास अस्पृश्यांकरिता मिस क्लर्क होस्टेल सुरू केले. या सर्व चळवळींचा भाऊरावाच्या मनावर योग्य तोच परिणार होऊन ते सत्यशोधक बनले आणि मागासलेल्या अस्पृश्य वर्गासाठी आपले तन मन धन वेचण्याची त्यांनी प्रतिज्ञा केली.

१९०८ साली हायस्कूलचा मॅट्रिक पर्यंतचा अभ्यास करून भाऊरावाने कोल्हापूर सोडले ते उरूण इस्लामपूरला आले. तेथे त्यांचे वडील नोकरीवर होते. कोठेतरी रेव्हेन्यू खात्यात नोकरी धर असा त्यांनी पुष्कळ आग्रह केला, पण भाऊरावला तो पसंत पडला नाही.  ‘मला नोकरी करायची आहे, पण त्याची जागा हे रेव्हेन्यू खाते नव्हे. जन्माला यावे आणि बूकर टी. वॉशिंग्टनसारखे जगून अमर व्हावे. सेवावृत्तीच पत्करायची तर महाराष्ट्रात लक्षावधि अस्पृश्य बांधव जनावराच्या जिण्याने जगत आहेत ; त्यांना शिक्षणदान देऊन त्यांचा आत्मोद्धार केला तर ती सेवा देवाघरी कितीतरी रूजू होईल, व्यवहारदक्ष वडिलांना ही आपल्या चिरंजीवाची महत्त्वाकांक्षा एकपरी उत्तम वाटली, पण व्यावहारिकदृष्ट्या कशीशीच वाटली. बरे, भाऊराव म्हणजे एक नंबरचा हट्टी. म्हणेल ते करील. मान तुटेल पण हट्ट तुटणार नाही. तेव्हा तो जसा जाईल तसाच त्याला जाऊ देणे हाच मार्ग वडिलांनी पत्करला.

पहिला जीर्णोद्धार

मागासलेल्या वर्गात शिक्षणप्रसाराशिवाय आत्मप्रबोधन होणे शक्य नाही, आणि त्या दिशेने आपण स्वतःच काहीतरी झिजले पाहिजे, या एकाच उदात्त हेतूने भाऊरावचे  चित्त व्यग्र झाले ; आणि आजसुद्धा त्याच्या सर्व धडपडी या एकाच दिशेने चाललेल्या आहेत. उरूण-इस्लामपूरला एक दिवस तरुण भाऊराव  तेथील शाळेवरून जात असता, एक गरीबसा मुलगा पाटी पुस्तके घेऊन वर्गाच्या बाहेर दरवाजापाशी पायरीजवळ बसला होता. मास्तर खोलीच्या दुस-या टोकाला वर्ग शिकवीत होते. त्यांचे काही शब्द कानी पडले तर पहावे, आली काही विद्या तर ठीक, नाहीतर नशीब. ही विवंचना त्या दीनवाण्या मुलाच्या चेह-यावर स्पष्ट दिसत होत, ताबडतोब भाऊराव  शाळेत शिरले. नमस्कार चमत्कार झाल्यावर ‘हा मुलगा एकटाच तिकडे बाहेर का बसविला ?’ म्हणून मास्तरास विचारले.

    मास्तर – ते एक महाराचे पोर आहे. शिकायला येते. त्याला आत कसे घ्यावे ?

भाऊराव – इतर मुलांना आत घेता तसेच घ्यावे. तो मुलगा माणूस नाही वाटतं ? विद्येच्या मंदिरात सुद्धा माणसांनी माणुसकीचा मान राखू नये काय ?

मास्तर – अहो पण तो महारा आहे. त्याला आम्ही कसे शिवावे ? काही धर्मबिर्म आहे की नाही ?

भाऊराव – बरं इतक्या लांब पायरीजवळ बसून त्याने शिकावे तरी कसे आणि काय ?

 मास्तर – अहे ही महारड्यांची पोरं. काय कर्म शिकणार ? सही करण्यापुरती अक्कल आली तर आली.

भाऊराव संतप्त झाले. त्यांनी त्या मुलाचा हात धरला आणि म्हणाले,  ‘‘बाळ तू या धर्मवान शाळेत जन्मभर बसलास, तरी काही फायदा होणार नाही. चल तू माझ्या घरी मी तुला स्वतः शिकवून विद्वान करतो. ’’ अस्पृश्यांचा हा कोण कैवारी आणि तो मज दीनावर कसा प्रसन्न झाला ? इत्यादी अनेक कल्पनातीत भावनांनी त्या मुलाचे हृदय भरून आले. तो टपटपा अश्रू गाळू लागला. भाऊराव त्याला तेथूनच घरी घेऊन आले. वडील मातोश्रींना हे हिंदू धर्माच्या लायकीचे व ‘समत्व योग उच्यते ’चे जिवंत चित्र दाखविले. तेथून त्या मुलास कोल्हापुरास नेऊन मिस क्लार्क होस्टेलमध्ये घातले व त्याचे शिक्षण इंग्रजी ६ यत्तेपर्यंत सर्वार्थ त्यागपूर्वक पूर्ण केले, वाचकहो, ते महाराचे गरीब महत्त्वाकांक्षी पोर कोण ? माजी आमदार ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप M.L.C. हे होय, महाराष्ट्रीय अस्पृश्यांच्या विद्यमान चळवळीतला हाच पहिला कर्तबगार तरुण, यांनी ‘मूकनायक’ नावाचे एक उत्कृष्ट साप्ताहिक चालवून, आणि कौन्सिलातही अस्पृश्यांच्या उद्धारार्थ पुष्कळ परिश्रम केले व सध्या करीत असतात. सांप्रत, साता-यास ते डिस्ट्रिक्ट लोक बोर्डचे व स्कूल बोर्डचे मेंबर आहेत हे उत्तम भाषक व लेखक आहे. अलीकडे अस्पृश्यांमध्येच जी भटी धाटणीची व्यक्तिद्वेषाची वावटळ सुरू झालेली आहे. तिला कंटाळून श्री. घोलपांनी सध्या भाषण लेखन तपश्चर्येत मूक वृत्ती झारण केलेली आहे. पण आम्हाला आशा आहे की अस्पृश्य समाज हिरा आणि गारगोटीतला भेद लवकरच जाणून, घोलपासारख्या स्वयंप्रकाशी पुढा-याच्या कर्तबगारीचा आत्मप्रबोधनार्थ योग्य तो उपयोग करून घेईल.

भाऊरावचे शिक्षणदानाचे कार्य केवळ स्पृश्य वर्गापुरतेच होते असे नव्हे. मराठे व तत्सम जातींतल्या अनेक मुलांनाही त्यांनी पदरमोडीने शिक्षण, कपडे, पुस्तके पुरवून आज चांगल्या प्रतिष्ठित स्थितीत आणून ठेवले आहेत. कोणी पोलीस सब इन्स्पेक्टर, कोणी वकील, कोणी शिक्षक, तर कोणी कारकून अशा नानाविध व्यवसायात ते आहेत. एका जैन परिषदेच्या प्रसंगी व्होलंटियरचे कॅप्टन होते. त्यावेळी त्यांची चलाखी, शिस्त, टापटीप वगैरे पाहून मुंबईचे सुप्रसिद्ध दानवीर शेठ माणिकचंद पानाचंदनी दरमहा ३० रु. स्कॉलरशिप देऊन हि-या मोत्यांची परीक्षा कशी करावी, याच े शिक्षण देण्याकरिता मुंबईस स्वतःच्या पेढीवर नेले. त्याचवेळी दावर्स कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये भाऊरावांनी अक ौंटन्सीचा कोर्स घेतला होता. पुढे आजारी पडून १९११ परत साता-यास आल्यावर भाऊरावांनी एका वर्षात इंग्रजी २ ते ३ इयत्ता शिकवण्याचा एक खाजगी वर्ग उघडला. या वर्गात मागासलेले ब्रा म्हणेतर व अस्पृश्यांची पुष्कळ मुले शिक्षण घेत असत. पण त्यात बराचसा भरणा मोफत विद्यार्थ्या ंचाच होता. कारण, गरजू विद्यार्थी आणि तो भाऊरावच्या दारात आला की पुरे, त्याची सोय झालीच. मग त्या पायी वाटेल ते नुकसान झाले तरी त्याची भाऊरावला पर्वा काय ? काले येथील बरेच विद्यार्थी या क्लासात असत. त्यांची हुषारी पाहून कित्येक आय.सी.ए. अधिका-यांनी त्यांना खासगी स्कॉलरशिप्स दिल्या व ते परत विलायतेला गेले तरी तेथून परस्पर त्यांच्या विद्यार्थ्यांना मनीऑर्डरी येत असत. भाऊरावाच्या प्रयत्नामुळे सातारा जिल्ह्यात काले हे सर्व उत्तम चळवळीचे केंद्र झाले आहे. या इंग्रजी क्लासामुळे पुष्कळ गरीब विद्यार्थी स्वावलंबी झाले व आजही आपल्या ‘पाटील मास्तर ’चे उपकार कृतज्ञतापूर्वक स्मरत असतात.

सन १९०९ साली वडिलांची बदली साता-यास झाली. त्यावेळी रूद्राजीराव राजे महाडिक मराठा समाजात जागृतीचे प्रयत्न करीत होते. त्यांच्याशी भाऊरावाने सहकार्य करून व्याख्यानाद्वारे पुष्कळच मदत केली. औद्योगिक व शेतकरी संवर्धक संस्था काढून, त्यांतील फायद्यावर मोफत शिक्षणाचे कार्य करता येईल, ही एक नवीन कल्पना भाऊरावला त्यावेळी आली ; आणि प्रयोगासाठी क ॅप्टन रामचंद्रराव हरजीराव महाडिक, रा. सा. तात्या रावजी पाटील, पिलाजीराव शिर्के, रामभाऊ चिटणीस व बाबासाहेब चित्रे वकील, यशवंतराव प्रतापराव गुजर, दुधुस्कर मामलेदार इत्यादी मंडळीच्या सा हाय्याने

कृषिकर्म सुधारणा मंडळ

नावाची एक संस्था रजिस्टर करून घेतली. मि. ब्रॅन्डन कलेक्टरने मंडळाच्या डेप्युटेशनला सर्व प्रकारची मदत देण्याचे आश्वासन दिले. कोरेगावचे भाऊसाहेब बर्गे यांनी आपल्या मालकीची २०-२५ एकर जमी न लांब मुदतीने व कमी दराने मंडळाला दिली. डॉ. मॅन साहेबाने पाणी व मातीचे अनालिसिस केले. अग्रिकल्चरल खात्याचे इंजिनिअर परांजपे व शूट साहेब यांनी लिफ्ट इरिगेशनचा सल्ला दिला. शेअरच्या विक्रीसाठी भाऊरावने पंजाबात कोहटपर्यंत प्रवास केला. पण इतक्यात भाऊरावावरच कोल्हापुरी राजकारण ाचे प्राणघातक गंडांतर आल्यामुळे या मंडळाला राम म्हणावा लागला.

कोल्हापुरी राजकारणी गंडांतर

अर्धवट आणि किंचित अस्पष्टच का होईना, पण १९१४ साली कोल्हापुरात एडवर्ड बादशहाच्या पुतळ्याला डांबर फासल्याचे जे एक भयंकर प्रकरण उपस्थित झाले होते त्याचा एक महत्त्वाचा भाग आजच प्रशमतः प्रबोधनात मुद्रणसंस्कार होऊन जगापुढे येत आहे. बोलून चालून ते राजकारण ! तेव्हा त्याच पापुद्रेही फार हलक्या हाताने सोलण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी घडलेल्या किंवा मुद्दाम घडविलेल्या अत्याचाराची मढी उकरण्यात अनर्थ नसला तरी अर्थ आहे. अनर्थ झाला तरी त्याची आम्हाला पर्वा नाही. खबरदारी एवढीच घेतली आहे की या अत्याचाराचे वणवे पेटविणा-या कित्येक जिवंत नरपशूंचा नामनिर्देश अज्जिबात गाळून त्यातल्या अत्याचाराच्या अध्यायात पूर्ण स्वाहाकर केलेला आहे. 

कदाचित; त्यात त्यांचा स्वतःचा दुर्दैवी संबंध जोडण्याच्या कोल्हापुरी पोलिसांनी केलेल्या भानगडी या शूद्र राजमान्य  ‘पोलीसी पॉलिसी ’ असल्यामुळे त्यांचे महत्त्व प्रो. लठ्ठे यांनी भावी दिवाणपदप्राप्तीच्या मुत्सद्देगिरीने डावलण्याची चलाखी दाखविली असावी, असे  आम्हाला वाटते. १९०७ सालच्य ा टिळकपंथी माथेफिरूंची अत्याचारी कारस्थाने कोल्हापुरात सुरू झाली. त्यामुळे संस्थानानेही यांना पायबंद घालण्यासाठी आपल्या उघड गुप्त पोलीस यमदुताच्या सेनेला सर्वाधिकारांची शस्त्रसामुग्री भरपूर दिली तेव्हा पासून कोल्हापुरी पोलीस म्हणजे प्रतिसृष्टीकर्त्या विश्वमित्राचे बाप आणि यमधर्माचे शिरजोर सावत्र भाऊच बनले होते. राज्यकर्त्यांचे कानच या महात्म्या ंच्या हाती पडल्यावर वाटेल त्या सावाचोरीची मान फासावर लटकविणे म्हणजे विडीच्या झुरक्या इतकीच त्यांची सहज लीला होऊन बसली. असल्या नाजूक परिस्थितीत १९१४ साली कोणी माथेफिरू माणसाने कोल्हापुरच्या बागेतील एडवर्डच्या पुतळ्यावर डांबर ओतल े. जिकडे तिकडे हाहाःकार उडाला. पोलीशी ठाणी गदागदा हादरली. गुप्त दूतांची नाके व कान मैलमाल लांब वाढले. डांब-या बेरड हुडकून काढण्याच्या तगाद्याचा महाराजांचा हंटर पो. सु. फरनांडीझच्या पाठीवर दिवसातून २४ वेळा फडाडू लागला. गावातील रिकामटेकड्या उपद्व्यापी लोकांनीही पोलिसाशी गुप्तसेनेत प्रवेश करून घेतला. असे करण्यात या हरामखोरांचा उद्देश निराळात असतो. पोलिसांचे पाठबळ मिळाले म्हणजे अनेक सुष्ट-दुष्ट व्यक्तीवरील आपल्या खासगी किंवा व्यावहारिक व्यक्तिद्वेषाचा सूड भरपूर उगवून घेता येतो. ‘’

यावेळी लठ्ठे, डोंगरे आणि जाधव या तीन विद्वानांचे तेज कोल्हापुरात बरेच होते. प्रत्येक विवेकवादी तळवळीत हे पुढारी असत. जात्याच विद्वान, बहुश्रुत, व्यासंगी आणि चिकित्सक सल्यामुळे या तिघांपुढे कोल्हापुरातील सर्व ब्रा म्हण, ब्रा म्हणेतर शालशिष्ट, तेजोहीन झाले होते. सामाजि क चळवळीबरोबरच राजकीय सुधारणेवि षयी त्यांच्या स्पष्टोक्ती राजसत्तेला जवळजवळ डोईजड होऊ लागल्या होत्या. विशेषतः प्रो. लठ्ठे यांच्य वाग्लेखन शरचापल्यामुळे त्यांच्या हितशत्रूच्या पलटणी कोल्हापुरात ब-याच निर्माण झाल्या होत्या. जातीतीलही बरेच उपद्व्यापी लोक त्यांच्य ा पाड ावाचा प्रय त्न करीत होते. कित्येक कोल्हापुरी अधिका-यांना व पोलीस खात्यालाही प्रो. लठ्ठे यांनी वेळोवेळी टाइम्स वगैरेच्या कलमातून प्रतोदप्रहार लगावलेले असल्यामुळे. तेही त्यांच्यावर मनातून जळफळत असत. अशा लोकांना ही पुतळ्याचे डांबर म्हणजे प्रो. लठ्ठ्याविरूद्ध चालवायला एक उत्तम शस्त्रच सापडले. हितशत्रुंची अक्कल आणि पोलिसी शक्कल या दोन शक्ती एकत्र एकवटल्यावर काय घटना निर्माण होणार नाही ? निश्चित नप ुंसकावरची जबरी संभोगाचा आरोप सिद्ध होईल, मग सुविद्य सुसंस्कृत आणि विवेकी मनुष्यावर पुतळ्यावर डांबर ओतणे, पोलिसी अफवेच्या हातचा मळ !

प्रो. लठ्ठे या प्रकरणात अडकवायचेच इतके निश्चित ठरल्यावर, मग पुराव्याला काय तोटा ? पुराव्याने आरोपी हुडकण्याऐवजी, आरोपासाठी पुरावा हुडकण्याचे काम फार सोपे असते ; आणि या कामी बलिदानासाठी निश्चित ठरविलेल्या अजापुत्राचे जातभीच जर इतर हितशत्रूंसह अहमहमिकेने पुढे सरसावले, तर चोर सोडून संन्याशाला फाशी द्यायला पोलिसांच्या बापाचे काय वेचते ? पुराव्यासाठी प्रो. लठ्ठ्यांच्या विरुद्ध सणा-या निदान आहेत अशा दिसणा-या व्यक्ती शळोधम्याची खटपट सुरू झाली. त्याचा एक सूक्ष्म धागा १९०६ सालच्या जैन बोर्डांगातल्या दाढी प्रकरणाला जाऊन लठ्ठ्यांच्याविरूद्ध आहे. या (भ्रामक) भावनेने त्याला पुराव्याचा साक्षीदार म्हणून मथविण्याचा बेत ठरला. दाढीप्रकरणानंतर दुस-याही एका सामाजिक मतभेदाच्या प्रश्नात भाऊरावने अण्णासाहेब लठ्ठ्यांना मतभेदाची जोरकस टक्कर दिलेली होती. परंतु मतभेद म्हणजे हाडवैर अशा समजुतीच्या पिचणा-या कावळ्यांना या दोन विवेकी तरुणांच्या आत्मीय जिव्हाळ्याची काय कल्पना असणार ? 

अण्णासाहेबांच्या विरुद्ध जे करस्थानी अ ब क ड मंडळ उभे राहिले, त्यातल्या एका क ने ला कोरेगावास त ार पाठविली की जरूरीचे काम आहे, ताबडतोब येऊन भेटा. गरीब व गरजू मुलांना शिक्षणदान करण्यातच आनंदमग्न झालेल्या भाऊरावला या कोल्हापुरी कोलदांड्याची काय कल्पना असणार ? तार मिळताच भाऊराव कोल्हापुरला गेले. दिवस इकडच्या तिकडच्य गप्पात गेला. रात्री जेवण आटोपताच हळूच पोलिसी थाटात विषय निघाला. ‘दीड महिन्यापूर्वी येथल्या एडवर्डच्या पुतकळ्याला डांबर फासण्यास आलेली आहे. पोलिसांनी तपास करून छडा लावला आहे. त्यात अण्णासाहेबा लठ्ठ्यांचा हात आहे, अशी त्यांची खात्री झाली आहे. महाराजांना मला खास सांगितले की या बाबतीत भाऊराव पाटलाने सरकारच्या बाजून साक्ष देऊन अण्णासाहेबांच्याविरुद्ध पुरावा केला पाहिजे. यात तुमचे कल्याण आहे. असे न कराल तर काय प्रसंग ओढवेल याचा नेम नाही. ’ भाऊराव चकित झाले. क्षणभर विचार करताच त्यांना उमगले की आपण का भयंकर जाळ्यात येऊन पडलो आहोत. काय वाटेल ते करून अण्णासाहेबांना चिरडण्याचा हा राजमान्य कट आहे आणि या कामी खाटकाचे काम बळजबरीने आपल्या माथी लादण्याचा हा नातूशाही पेच आहे. 

भाऊरावाने दोन्ही कानावर हात ठेवून ‘क’च्या सूचनेचा शक्य त्या तीव्र शब्दात निषेध केला. त्या गृहस्थाची पुष्कळ निर्भर्त्सना केली. परंतु उपयोग काय ? प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पोलिसी पेच पडल्यावर नेहमीच्या व्यवहारातली निषेधी सभ्यता किंवा माणुसकीचा सात्विक अथवा तामसी त्वेष म्हणजे पालथ्या घड्यावरील पाणी किंवा नपुसकापुढे पद्मिनीचा शृंगारच ठरायचा ! भाऊरावला मथविण्यात कटवाल्याने जान जान पछाडली. महाराजांच्य क्रोधाची धमकी घातली. सर्व काही केले. पण तो काही वठेना. रात्री १२ चा सुमार झाला. ज्या घरच्या माडीवर ‘क’ आणि भाऊराव यांची शाब्दिक झटापट चालली होती. त्याच्या तळमजल्यावर एकाकी आग लागली म्हणण्यापेक्षा लावली म्हणणेच योग्य होऊल. जिकडे तिकडे धावाधाव होऊन आग विझली, त्याच गडबडीत  ‘क’ने पुकारा केला की,  ‘माझ्या एक हजार रुपयाच्या नोटा चोरीस गेल्या. ’ पोलिसाने तक्रार टिपून घेतली. स्थिरस्थावर झाल्यानंतर ‘ क’ भाऊरावला ठासून म्हणाला, ‘आता वळणावर येतोस की हे आगीचे आणि चोरीचे त्रांगडे अडकवू तुझ्या गळ्यात ?’ भाऊरावने तितक्याच जोराने उत्तर दिले,  ‘तुझी अवलाद जैनाची आहे की x x x? मी फासावर गेलो तरी बेहत्तर, पण खोटे काम कधी करणार नाही. जा तुला वाटेल ते कर. ’ या वेळी पहाटेच्या ५चा सुमार होता. थोड्याच वेळात एकदम काही पोलिस  ‘क’च्या माडीवर घुसले आणि भाऊरावला पकडून घेऊन गेले.

कोल्हापुरी पोलिसांचे अत्याचार

भाऊरावची अटक केवळ पोलिसी प्रेरणेनेच होती असे नव्हे, तर त्याच सूत्र खुद्दाकडूनच हालत होती. वाटेल ती उलाढाल करून डांबर प्रकरणात लठ्ठ्यांना लोळविण्याचा महाराजांचा निश्चयच होऊन बसला होता. मग त्याच्या मागे पोलिसांची कानटोचणा असो, नाहीत लठ्ठ्यांच्या हितशत्रूंची हातलावणी असो. भाऊरावला जामिनावर सोडविण्याचा काही मित्रांनी प्रयत्न केला, पण अर्ज नामंजूर झाला. इतकेच नव्हे, तर तास प्रयत्न करणाराना, ‘याद राखून ठेवा ’ या त्र्याक्षरी पदवीचे धमकीदान झाले.

कावळ्याचा बंगला ’ हे एक कोल्हापुरातले कुप्रसिद्ध स्थळ आहे. या एका बंगल्यात अत्याचाराचे अमानुष प्रकार झाले आहेत तितके यमपुरीच्या देखाव्यात सुद्धा पहायला मिळायचे नाहीत. ‘तुला जरीमरी येवो ’ असा कोणी कोणाला शाप दिला तर मनुष्य त्याची हसण्यापलीकडे किंमत करणार नाही, पण १९०७ सालापासून कोल्हापुरात कावळ्याचा बंगला हे नाव ऐकताच शेकडो माणसे गारठून जात असत. आरोपीच्या तोंडून सत्याचा अर्क पिळून काढण्याचे पोलिसी घाणे या बंगल्यात राजरोज रात्रंदिवस सुरू असत. अमक्या तमक्याला ‘कावळ्याच्या बंगल्यावर नेला ’ इतकी बातमी कळली की खुशाल त्याची सर्वांनी आशा सोड ावी. परत आलातर पुनर्जन्म होऊनच यायचा. सत्यार्क पिळून काढण्याची सर्व आयुधे या बंगल्यात सज्ज असत आणि ती पद्धतशीर उपयोगात आणणारे कसाईही त्याकाळी कोल्हापुरी पोलीससेनेत पुष्कळ असत.

भाऊराव जर डांबर - प्रकरणात अण्णासाहेबा लठ्ठे यांच्याविरुद्ध साक्षीचा पुरावा करता, तर सहज पाच सहा हजार रुपये खिशात टाकून मोकळा सुटता. पोलिसांनी मुस्कटामारी, उरधोंडी, बरगडफोडी वगैरे प्राथमिक समजुतीचे प्रयोग भाऊराववर केले. पण तो काही बनेना ! अखेर त्याला कावळ्याचा बंगला दाखविला. तेथे तक्तपोशीच्या बहालाला भाऊरावचे हातपाय बांधून टाकीत आणि खालून पाठीवर व कुल्यवार चामड्याच्य हंटरचे तडाखे हाणीत. एक हंट-या थकला की दुसरा. दुस-यानंतर तिसरा. थोडी विश्रांती, पुन्हा ‘मागील अंकावरून पुढे चालू ’ असा प्रकार रक्तबंबाळ होईपर्यंत चाले. भाऊरावशिवाय आणखीही काही तरुण पोलिसाच्या पहा-यात बहिर्विधीसाठी बाहेर असताना, वाटेत एक रिकामी विहीर भाऊरावला लागली. विहिरीत पाणी नव्हतचे. वर खाली बाजूला काळा कडक फत्तर. क्लेशपूर्ण जिवाचा पूर्णविराम करण्याचीही संधी छान आहे. असा निश्चय करून, पोलिसांची नजर चुकवून, भाऊरावने  हिसक्यासारखे खाली डोके करून धाडकन विहीरीत उडी घेतली.कल्पनी ही की डोके कातळावर आपटून चटकन प्राण जावा ! परंतु, वेळ आली तरी काळ आला नव्हता. खाली डोके करून उडी मारली, तरी अखेर तळाच्या चिखलावर भाऊराव  ढुंगणावरच सुखरूप येऊन आदळला. कोठे काहीच दुखापत नाही. पूर्वी लहानपणी सर्पदंश झाला होता, त्यातूनही बचावला. त्यानंतर हा आत्महत्येचा प्रसंग विलक्षण चमत्काराने टळला. पोलिसांनी धामधूम करून आरोपीला वर काढले. मॅजिस्ट्रेटपुढे उभे केले. जबानी घेतली. आत्महत्येचा आरोप ठेवला. दवाखान्यात रव ानगी झाली. येथून सुटल्यावरही पुन्हा कावळ्याचा बंगला आणि शिक्षा आहेच. त्यापेक्षा पुन्हा एकदा या कष्टमय जिवाचा अंत करण्यासाठी भाऊरावने तावदानाची काच फोडून त्याची मूठभर भुकटी खाल्ली. तास दीड तास झाला तरी काही परिणाम होईना, म्हणून वर एक बाटलीभर घासलेट पिऊन टाकले, पण काहीच परिणाम झाला नाही. पुढ े दवाखाना सुटल्यावर न्यायदान होऊन, आत्महत्येच्या प्रयत्नाबद्दल ८ महिन्यांची साधी कैदेची शिक्षा ठोठावण्यात आली. कैद साधी होती. तरी भाऊरावला बिलंद कटवाला दामू जोशाच्याच कोठडीत कोंडण्यात आले होते.

प्रो. लठ्ठे यांना प्रत्यक्ष जरी अटक केली नव्हती, तरी त्यांच्यावर गुप्त पोलिसांची सक्त छाया ठेवण्यात आली होती आणि त्यांच्या टेबलातून काही ‘राजद्रोही वाङ्मय ’ही कोल्हापुरी चित्रगुप्तांनी पैदा करून त्यांचे पुराव्याच्या बरणीत लोणचे घालून ठेवले होते. कावळ्याच्या बंगल्यातून पुराव्याची प्रसूती होताच लठ्ठ्यांना कड्याबेड्या ठोकण्याची जय्यत तयारी होती, पण पुरावाच तयार होईना. कित्येक लाळघोट्या प्रतिष्ठित 

अधिका-यांनी जेलमध्ये जाऊन भाऊरावला ‘सरकार म्हणतात तसे म्हणावे. ’  म्हणून आग्रह केला. वकीलपत्रावरही सही कबुलीपत्रावर उमटविण्याचा एक मराठी वकीलानेही कारवाई केली ; पण भाऊरावच्या आईच्या तत्कालिक दक्षतेने ते पत्रक चुलीत गेले. महाराजांनी तिला बोलावून ‘भाऊराव जर योग्य ती जबानी देईल तर तुला पाच हजार रुपये रोख व जमीन देऊ. ’ अशी गळ घातली. भाऊरावचीच आई ती, तिने स्पष्ट करारीने उत्तर दिले, ‘महाराज, मला चार मुलगे आहेत. त्यातला एक मेला म्हणून समजेन. पण मी खोटे काम करणार नाही, आणि भाऊरावही करणार नाही. ’ एक दिवस खास महाराजाकडून समजूत करून पहावी म्हणून पुन्हा भाऊरावला भेटीस नेले. पुष्कळसे व्याख्यान ऐकून घेतल्यावर भाऊरावने एकच उत्तर केले, ‘‘या जगात मला आता जर काही आश्रयाचे व संरक्षणाचे ठिकाण असेल तर ते एकच – मरण. तेवढे आपण द्यावे म्हणजे झाले मला जास्त बोलण्याची इच्छा नाही. ’’

जोपर्यंत भाऊरावावर निश्चित काही आरोप जाहीर करण्यात आलेला नव्हता. पोलिसी तपासाचेच फार्स चालत होते. तोपर्यंत त्यांच्या वडिलांना मित्रांना आणि हितचिंतकांना काहीच प्रयत्न करता येईना. अखेर मुख्य भानगडीचा मुद्दा बाजूस राहून जेव्हा आत्महत्येच्या प्रय त्नाबद्दल शिक्षा झाली, तेव्हा वडिलांनी अपील दाखल करण्याच खटपट सुरू केली. इकडे कोल्हापुरी पोलिसांचे प्रयत्न मात्र बंद पडले नव्हते. त्यांनी ब्रिटीश सरकारकडून दोन पटीत गुप्त पोलिस मदतीला बोलावले होते. त्यापैकी एकाने भाऊरावच्या सातारच्या राहत्या घरात राजद्रोही वाङ्मय पैदा करण्याचा विश्वामित्री घाट घालून, या खटपटीत सातारचे त्यावळचे फौजदार कै. अनंतराव गणेश देशमुख यांच्या सहकार्याची याचना केली. भाऊराव पाटील ही व्यक्ती कोण आहे आणि तिचा समाजिक दर्जा काय आहे, याची कल्पना सातारचे कलेक्टर मि. ब्रांडनपासून तो थेच एखाद्या अस्पृश्याच्या झोपडीपर्यंत सर्वांना स्पष्ट होती, आणि भाऊरावावर उद्भवलेल्या निष्कारण गंडांतराकडे सर्व काळजीपूर्वक नजर ठ ेवून होते. भाऊरावच्या घरात झ़डतीमध्ये पैदा करण्यासाठी आणलेला कोल्हापुरी कोलदांड्याचा बनावट पुरावा देशमुख फौजदाराने प्रथम हस्तगत करून घेतला आणि त्या गुप्त पोलिसांना दम भरला. ‘या पुराव्याच्या जोरावर मी आता तुम्हाला अटक करून बेड्या ठोकतो, तुम्ही काय समजलात ? हरामखोर, खोटे पुरावे तयार करता ? लाज नाही वाटत तुम्हाला ? आत्ताच्या आत्ता साता-याची हद्द सोडून चालतचे व्हा, नाही तर तुमच्यावर खटला भरल्याशिवाय सोडणार नाही. ’ गुप्त पोलिसांना देशमुखांची पायचाटणी करता करता पुरेवाट झाली व त्यांनी तात्काल तेथून पलायन केले.

हा डाव फसल्यावर दुसरा प्रयत्न झाला. औंध प्रकरणात प्रसिद्धीस आलेला सातारा जिल्ह्यातील गणपती मांग याला भाऊरावविरुद्ध कोल्हापुरी राजद्रोहाची साक्ष देण्यासाठी कोल्हापूरास नेले. त्याला पुष्कळ मथकवले आणि तोही कबूल झाला. ‘भाऊ पाटील ’ म्हणजे कोण प्राणी, ही त्याला प्रथम कल्पनाच येईना. असेल कोणी सोम्या गोम्या माझ्या साक्षीने मेला तर मरेना का. एवढीच त्याची समजूत, प्रत्यक्ष रुजुवात करून जबानी घेण्याची वेळ आली आणि कैदी भाऊरावाला गणप्या मांगापुढे आणून उभे केले मात्र, तो त्याला एकदम विलक्षण गहिवर येऊन त्याने ‘कोण पाटील मास्तर ?’ म्हणून आरोळी ठोकून भाऊरावच्या पायाला घट्ट मिठी मारली. मोठमोठ्याने रडू लागला. काही केल्या पाय सोडीना. ‘भाऊराव पाटील ’ म्हणजे मांगवाड्यात येऊन आपल्या मुलाला श्रीगपासून ते  इंग्रजी ५व्या यत्तेपर्यंत मोफत शिक्षण देणारा दीनांचा पुरस्कर्ता  ‘पाटील मास्तर ’ हे पाहून गणप्या मांग ओक्साबोक्सी रडू लागला. तो कडव्या उच्चारात पोलिसांना म्हणाला, ‘ मला या पाटील मास्तरांच्या विरुद्ध साक्ष द्यायला सांगता काय ? माझी मान तोडलीत तरी हा गणप्या मांग ही कसाबाची करणी करणार नाही. अरे, ज्याने माझ्या मांगाच्या पोराला विद्या शिकवून माणुसकी दिली, त्याची मान मी कापू ? जातीने मी मांग आहे. मी पाटील मास्तरशी बेमान नाही होणार. ’ जातीवंत मांगसुद्धा जेव्हा पोलिसांपेक्षा माणुसकी दाखवू लागला, तेव्हा त्याला आणला तसा परत रवाना केला. ब्रिटीश गुप्त पोलिसांपाकी रा. मडूरकर नावाचे एक सभ्यवृत्तीचे सब इन्स्पेक्टर होते. त्यांनाही देशमुख फौजदाराप्रमाणे खोट्याची फार चीड असे. ते वरचेवर भाऊरावला जेलमध्ये भेटून धीर देत असत. इतकेच नव्हे तर, असा सप्ष्ट इशारा देत की ‘कोणी वाटेल ते केले तरी खोटे कधी सांगू नकोस. ’

इकडे भाऊरावचे अपील दाखल झाले. घडलेल्या सर्व प्रकाराचाही गवगवा झाला. सातारचे कलेक्टर मि, ब्रांडन साहेब या प्रकरणाकडे सहानुभूतीन े पाहू लागल ा. पोलिटिकल एजंटकडे त्याची तक्रार गेली. त्यांनीही खास चौकशी केली. तेव्हा होत असलेला साराच प्रकार शून्यातून ब्र म्हांड निर्माण करणारा आहे, असे त्यांना प्रत्यंतर पटले. कैदी भाऊरावची त्यांन आपल्या बंगल्यावर एकांती भेट घेऊन सर्व खुलासा काढला. त्याचा परिणाम अपीलावर होऊन भाऊराव माफीत सुटले. पण सुटेपर्यंत दीड महिन्यांची शिक्षा मात्र भोगली. या अपिलात सुटताच, कोल्हापूरच्या पोलीस कमिशनरने नवा तोंडी हुकूम काढला की, डांबर प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत भाऊरावने कच्च्या कैदेत राहिले पाहिजे. 

हा हुकूम देऊन त्याला जेलकडे घेऊन जात असताना रेल्वेच्या कंपौडात त्याने उडी घेतली.  ‘मी ब्रिटीश हद्दीत उभा आहे. खबरदार माझ्या अंगाला हात लावाल तर. ’ इतक्यात रेल्वेचा पोलीसही तेथे आला. त्याला भाऊराव म्हणाले,  ‘तुला वाटेलतर मला पकड. मी रेल्वेच्या किंवा ब्रिटीश पोलिसांच्या ताब्यात जायला खुशी आहे. माझ्यावर काही आरोप असेल तर ब्रिटीश कोर्टात होईल त्याचा निकाल. ’ कोल्हापुरी पोलीस हात चोळीत गेले. रेल्वे पोलिसाने विचारपूस करून भाऊरावला सोडून दिले. पुढे लागलीच वडिलांनी कोल्हापुरी कायद्याची भूक शमविण्यासाठी जामीन दिला व येथेच हे प्रकरण विझले. या बाबतीत भाऊरावने मुंबई गव्हर्नरला एक मोठा विस्तृत तपशिलाचा अर्जही पाठविला होता. त्याची नक्कल अस्तित्वात आहे. तब्बल सहा महिने निष्कारण यमयातना भोगल्यामुळे भाऊरावांच्या शरीर प्रकृतीवर एवढा भयंकर परिणाम झाला होता की कोणालाही चटकन ओळख पटली नाही. पुनर्जन्मच तो !

भाऊरावांवर निष्कारण आलेल्या या भयंकर गंडांतराच्या घटनेवरून वचकांना पुष्कळ निर्णय काढता येतील. भाऊरावांच्या शिलातील कमावणी किती खडतर तपश्चर्येची आहे आणि आज त्यांनी जी त्यागी कंटक वृत्ती बनलेली आहे. त्यात जगातल्या कटू अनुभवाचा मसाला किती पडलेला आहे. याचा पुष्कळ उलगडा होतो. या कहाणीत रौद्र, बीभत्स, करुण आणि वत्सल रस अपरंपार भरलेले आहेत. जीव गेला तरी खोटे कर्म करणार नाही, या वृत्तीने भाऊरावाने हे एवढे भयंकर क्लेश ज्या अण्णासाहेब लठ्ठ्यांसाठी भोगले त्यांना प्रत्यक्ष त्रास किती झाला आणि डांबर –प्रकरणात त्यांना हकनाक लटकविण्यात शाहू महाराजांचा डाव कोणता होता, इत्यादी माहिती लठ्ठेच सांगतील तेव्हा जगाला कळेल. त्यांनी शाहू महाराजांचे चरित्र उत्तम तपशिलांनी कितीही रंगविले असले तरी शाहू महाराजांच्या राजधानीने खुद्द अण्णासाहेबांचे चरित्र मात्र फार बहारीच्या कुतूहलाने रंगविलेले आहे. यात मुळीच शंका नाही. 

एके काळी ज्यांना राजद्रोहाचा शिक्का ठोकून रसातळाला नेण्यासाठी ज्या रियासतीच्या राजकारणाने आपले जंगजंग पछाडले व एकदा प्रत्यक्ष अटकही  केली होती, त्याच रियासतीच्या कर्तुमकर्तुमन्याथशकर्तुम दिवाणगिरीवर त्यांची अचानक नेमणूक झालेली पाहून, करणीच्या काळापेक्षा काळाचीच करणी अगाध खरी, असा कोणाच्याही तोंडून उद्गार निघेल. या डांबर प्रकरणात  ‘भिंतीचा निर्जीव हंस, त्याने गिळिले हारास ’ हा चमत्कार स्पष्टच होता, पण पुढे पहावे तो हातपाय तोडलेला विक्रम तेल्याचा घाणा हाकतो काय, दीपराग आळवताच इलेक्ट्रिसिटीचे बटन दाबल्याप्रमाणे दिवे लागतात काय ! राजकन्येचे लक्ष त्या दीपोत्सवाकडे वेधते काय आणि विक्रमाचा भाग्योदय होतो काय ! साराच चमत्कार . ज्य ा कोल्हापुरात सिएडी एक वेळ अण्णासाहेब लठ्ठ्यांवर कडव्या कदरीची टेहळ ठेऊन बसले होते. त्याच कोल्हापुरात तेच लठ्ठे त्याच सिएडी ऑफीसरावर दिवाणगिरीच्या करड्या हुकमतीने कोरडे ओढीत असताना त्या पालखीच्या बैलांना काय बरे वाटत असेल ? भाग्योदय व्हावा तर तो असा ! क्षात्रजगदुगुरूनी राजाराम महाराज छत्रपतींना वेदोक्त राज्याभिषेक केला. तो विधी संपताक्षणीत अण्णासाहेब लठ्ठ्यांनी पुन्हा उभे राहून आणखी एक कसलासा अभिषेक केला. ही बातमी वृत्तपत्रांत वाचताक्षणीच आम्ही तर्क केला की भिंतीच्या निर्जीव हंसाने गिळलेला हार तो ‘आज सावकाश उगाळीत ’ आहे खास.  

पुढे थोड्याच अवधीत दिवाणगिरीची विचारणा ! अण्णासाहेबांचे चरित्र अशा प्रकारच्या नानाविध कुतूहलांनी रंगलेले पाहून विधिघटनेचे मोठे कौतुक वाटते. शाहू महाराजांनी भाऊरावांचा एवढा छळ केला की त्यातून पुनर्जन्म होणे हा केवळ दैवयोग मानला पाहिजे. इतके असूनसुद्धा भाऊरावाची शाहू महाराजांवरील भक्ती तिळमात्र कमी झालेली नाही. ब्रा म्हणेतर चळवळ सुरू झाल्यानंतर महाराज भाऊरावला अनेक वेळा भेटले. मसलती केल्या, पण सगळ्या ब्रिटीश हद्दीत भाऊरावांनी कोल्हापुरात पाऊल ठेवले नाही. मृत्यूपूर्वी काही दिवस, मिरज स्टेशनवर, सातारा जिल्ह्यातल्या मागसलेल्या वर्गात दुय्यम शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी फंड जमविण्याची एक योजना दोघांनी ठरविली होती ती अशी. महाराजांच्या पदरी पुष्कळ मल्ल आहेत. ते नुसते पोळासारखे बसून असतात. महाराजांनी चार पाच जोड्यांचा खर्च चालवून त्या एका कमिटीच्या स्वाधीन कराव्या. लोकांना कुस्त्याची आवड फार. गावोगाव तिकिटे लावून मल्लांच्य कुस्त्या लढवायच्या आणि ते उत्पन्न शिक्षणप्रसारार्थ लावायचे तात्पर्य, कोणी कितीही छळ केला, निंदा केली, घातपात केले तरी भाऊराव म्हणतात, ‘माझे ध्येयच इतके उच्च आहे की त्यापुढे या लौकिकी गोष्टी विचारात घ्यायला माझी लहरच लागत नाही. शाहू महाराज व दुसरे दीनोद्धारक राजर्षि. मी दुस-या दृष्टीचा उपसाक आहे. पहिल्याबद्दल मी कधी विचारच करीत नाही. ’

भाऊरावच्या चरित्रावर बंदी :

प्रबोधन मासिकाच्या १९२६ अंक ४ थामधून संपादकीय खुलासा

 सध्या पत्रकारांचा व्यवसाय मोठ्या जोखमीचा झाला. वेळी वाटल्यावर किंवा तलवारीवरही हवी तशी कसरत करता येईल. पण कायदेबाजीचे चाप चुकवून एखादे नियतकालिक चालवणे अशक्य होत चालले आहे. कायद्याचे हात जसे लांबलचक आहेत. तसा त्याचा देहसुद्धा हवा तेवढा लांब रूंद ताणता येतो किंवा तिळाएवढा संकुचित करता येतो. ‘पानी तेरा रंग कैसा ? जिसमे मिलावे उस जैसा ’ कायद्याची स्थिती जवळजवळ अशीच आहे. त्याची व्याप्ती हवी तेवढी ताणता येते. आणि त्यावर हवा तो रंग बेमालूम चढवता योते. वृत्तपत्राच्य बाबतीत तर कायद्याची दृष्टी इतकी चमत्कारिक रंगेल आहे की, त्याने एखाद्या मजकुरावर अमुक एका रंगाची नजर टाकण्याची खोटी का त्याचा रंग तसा पालटलाच पाहिजे. एखाद्या प्रेमाच्या मजकुराच्या लालभडक रंगावर कायद्याने मत्सराची हिरवी नजर फेकली की पुरे, तांबडा रंगसुद्धा पटकन हिरवा पडतो. दुर्बीण लावा किंवा सूक्ष्मदर्शक यंत्र लावा, मग हिरव्या रंगाशिवाय दुसरा कोणताच रंग पाहणाराला दिसायचा नाही. इतर रोगांच्या साथीप्रमाणे कायद्याच्या दृष्टीच्याही निरनिराळ्या साथी वृत्तपत्रांच्या क्षेत्रात येण्याचे हंगाम गेल्या ३०-३५ वर्षांत लोकांच्या आठवणीत असतील राजद्रोहाची दृष्टी विकसित झाली की जिकडे पहाल तिकडे राजद्रोहच ! जातीजातीतील वैमनस्याची नजर खुलली की सर्वत्र १५३-अ चा दराबेस्त थामान ! अब्रूबाजीच्या रंगाची लाट आली की सारी कोर्टे बेअब्रूच्या खटल्यांनी गजबजून जायची !

ब्राम्हण-ब्राम्हणेतर वाद उतास जाऊ लागला की मग काय ? एखाद्या –हस्व दीर्घ वेलांटीतून सुद्धा ‘त्राहि माम् त्राहि माम् ’ किंकाळ्या मारीत एखादा गणित्या भटजी गव्हर्नर साहेबांच्या बुटापर्यंत लोळत जायचा ! अशा या नाना प्रकराच्या साथीत पत्रकारांच्या लेखणीतून उतरणा-या कोणत्या मजकुरावर कायद्याच्या कसल्या रंगाची छाया पडून, को णत्या वेळी त्याचा रंग कसा बदलला जाईल आणि त्या बरोबरच लेखकाच्य ा मूळ उद्देशाचा काय विपर्यास होईल, याचा या ब्रिटीश आमदानीत काही नेम नाही. न्याय चौकशीचे सारेच कार्य इंग्रजी राजभाषेत चालावयाची असल्यामुळे, देशी भाषेत लिहिलेल्या मजकुराची व त्यातील शब्दांची भाषांतराच्या भट्टीत जी काही कुतरओढ होत असते. ती पाहिली की पट्टीच्या वैय्याकरणाचाही मती अगदी गुंग होऊन जाते. रेघांच्या धारीचा शर्ट परटाकडे धुवायला द्यावा आणि शर्ट धुवून आलेला पहावा तो आरपार पांढराफेक ! अरे, रेघा काय झाल्या ? कच्च्या रंगाच्या होत्या. भट्टीत खलास झाल्या. अशातलाच प्रकार बहुतेक असतो, अलीकडे बीभत्स व बेअब्रूकारक वाङ्मयाचा शब्दकोश सताड फुगत चाललेला आहे.  ‘भट’ हा शब्द म्हणे बीभत्स. ‘ आग्यावेताळ’ म्हणजे अब्रूनाशक  ‘सूत्रधार’ शब्दांचे भाषांतर म्हणे ‘ वायरपुलर’ दुर्दैव त्या मराठी भाषेचे आणि त्या भाषेचे लेखन करणारांचे !

‘शनिदेव महाक्रूर ’ कितीही असला आणि त्याचा प्रताप ‘जैसी का ते खड्गाची धार ’ असला तरी तो सर्वांना सर्व काळी सारखाच ठेवीत नाही. हिवतापाप्रमाणे त्याच्या पाळ्या असतात. सध्या भटी पत्रकारांवर त्याची मेहरनजर आहे. किंबहुना सध्या तो त्यांच्या उदरीच आला आहे. म्हटले तरी चालेल. आज त्यांनी वाटेल ते लिहिले, छापले तरी परिस्थितीच्या जठरानलात ते बिनबोभाट पचले जात आहे. आता शनिची संक्रांत भटेतरी लेखकांवर वळलेली आहे. त्यातल्या त्यात ती मराठेतर लेखकांवर विशेष टवकारून पाहू लागली आहे. पंजाब, बंगालकडे या संक्रांतीचा वरवंटा ब-याच जोराने फिरत असला, तरी मुंबई इलाख्यातल्या पेशव्याच्या राजधानीत त्याला उत्तम प्ले ग्राऊंड सध्य ा लाभली आहे. पुण्याचा भटेतरांवरील वरवंट्याचा लौकिक काही आजकालचा नव्हे ! तो तर बारशाचा गोपा ! एवढी मोठी पेशवाई झाली ; पण तिने काय केले ? तर भटांची भोजने आणि भटेतरांवर ग्रामण्ये ! अखेर तर बेटावर चहाड्या चपगल्यांच्या कच-याचे गाडे इतके जाऊन साचले की पेशवाई कोठे व कशी खतम झाली याचा निश्चित ठावठिकाणी अजून एकाही संशोधकास लागलेला नाही. कवडी किमतीचे जानवे ते काय, पण त्यांच्यासाठी पेशवी पुण्यात भटेतरांचे रक्तपात झालेले आहेत. अर्थात असल्या पुण्यवान परंपरेच्या पुण्यपतनात हव्या कायद्याची हवा बिघडू लागली, तर कोणी कोणाला बोल लावावा ? कोणाचा तरी आब राखण्यासाठी विचार प्रदर्शनाच्या मैदानावर राब लावण्याचे निश्चित ठरल्यावर सुक्याबरोबर ओल्यालाही मोक्ष मिळणारच.

आम्ही पुण्यास आल्या दिवसापासून आम्हाला एक मोठा फायदा झाला. महाराष्ट्रातल्या हिंदू समाजाची स्थिती काय आहे. भटभटेतर चळवळीतील खरी वर्मे – मर्मे काय आहेत. पुण्य़ाबाहेर भरमसाठ घोंगावणा-या नानाविध चळवळींची खरी स्वरूपे व हेतू काय आहेत, बाहेरगावी बृहस्पती, देशभक्त, अस्पृश्योद्धारक, शेतक-यांचे कैवारी, शुद्धीसंघटन पुढारी, म्हणून मिरवणा-यांचा स्थानिक लौकिक व प्रत्यक्ष जीवनचर्या काय आहे, इत्यादी पुष्कळ मनोरंजक गोष्टींची प्रचिती येथे पडताळून पाहण्याचा आम्हाला सुयोग लाभलेला आहे. भटांच्या ‘ब्राम्हणी’ चळवळी आणि मराठ्यांच्या  ‘ब्राम्हणेतरी’ चळवळी कोणत्या रोखाने चाललेल्या आहेत. याचाही पायाशुद्ध अभ्यासाची येथे उत्तम संधी मिळाली. आमच्या बि-हाडाच्या घरापासून तो थेट आमच्या लेखनावर कायद्याच्या बहुरंगी दीपाचा शोधनप्रकाश पाडण्यापर्यंत ब्र म्हमुखोत्पन्नाची आमच्यावर किती वेदोक्त महाकृपा आहे. हे वेळोवेळी निःसंदिग्ध शब्दांत आम्ही प्रगट केलेलेच आहे. इतकेच नव्हे तर, गेल्या ३-४ वर्षांच्या प्रत्यक्ष अनुभवावरून, ब्राह्मणेतरी छावण्या व त्यांचे सूत्रधार हे सुद्धा आमच्याकडे भटी दृष्टीने कधी काळी पाहणारच नाहीत, अशी कल्पना आम्हाला कधी आलेलीच नव्हती, असाही प्रश्न नाही. फक्त कल्पनेला व संशयाला प्रत्यक्ष अनुभवाच्या कसाला लावीत होतो. आतातो अनुभव जवळजवळ सिद्धच होऊ लागला आहे. स्पष्ट कोणी लिहीत बोलत नसले तर ब-याच जबाबदार ‘ब्राम्हणेतरी’ मराठ्यांच्या डोळ्यांत प्रबोधनकाराची कायस्थ प्रभूजात अलीकडे बरीच सलू लागली आहे, यांत आम्हाला आता मुळीच संशय राहिलेला नाही. भट झाले काय किंवा भटेतर झाले काय, दोघांच्याही चळवळीत निखालस स्वजातीस्तोम प्राबल्य वाढलेले स्पष्ट दिसत आहे. अशा अवस्थेत ‘ स्वतंत्रमतवादी’ प्रबोधनाच्या  ‘लोकहितवादाचा’ कार्यक्रम संशय, निंदा, गैरसमज, छळ आणि अखेर शारीरिक हानी या निसर्गसिद्ध क्रमातून प्रवास करताना क्षणोक्षणी जागोजाग कितीही ठेचाळला आणि जखमी झाला, तरी तेवढ्याने त्याची विचारक्रांतीची तपश्चर्या बंद पडेल, अशी भीती बाळगण्याचे कारण नाही.

प्रत्येक लेखकाची विशेषतः वृत्तपत्रकारांची हीच इच्छा असते की, आपले प्रामाणिक विचार सर्वांनी विचारात घ्यावे. विशेषतः सरकारने घ्यावेच घ्यावे. त्यासाठी सरकारचे एक स्वतंत्र खातेही आहे. शिवाय काही विशिष्ट मतांच्या वृत्तपत्रकारावर सरकारच्या गुप्त दूतांची पाठराखणीही ठेवलेली असते. गेली २० वर्षे आम्ही लेखनव्यवसाय करीत होत. १९१८ सालापासून स्वतंत्र ग्रंथलेखनाला व १९२१ पासून प्रबोधनलेखनाला सुरुवात केली. इतक्या वर्षांच्या अवधीत अनेक महत्त्वाचे विषय सरकारच्या नजरेला आणण्याचा आम्ही अट्टाहास केला. पण तिकडे सरकारने ढुंकूनही पाहिले नाही, आज दिडकी दमडी आणा किमतीच्या क्षुद्र चोपड्यांवर कायद्याची कातर चालविणा-या सरकारला १९१८ साली एक प्रबुद्ध समजाची बेजबाबदार निर्भर्त्सना करणा-या भटी संस्थेला नुसता जाब विचारायलाही फुरसद झाली नाही. सरकारने लक्ष पुरवण्याजोग्या प्रबोधनातील विषयांची लांबलचक यादी देण्यात काही स्वारस्य नाही. मराठीत लेख लिहिले तर ट्रान्सलेटरच्या भट्टीत रेघांचा शर्ट पांढराफेक धुतला जायचा म्हणून काही जनहिताच्या विशेष महत्त्वाचे लेख मुद्दाम इंग्रजीत लिहिण्याचा परिपाठ सुरू ठेवला. तरीही सरकार थंडच ! कधी विचारपूस नाही, चौकशी नाही, कानपिचकी नाही, काही नाही ! आमच्या काही प्रेमळ पुणेकर ब्र म्हबृहस्पतींनी आमच्या लेखणीचीही उलटापालट व बदलाबदल करण्याची तोंडचलाखी गटार यंत्रामार्फत जाहीर केली. तरीसुद्धा पोलीस किंवा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट साहेबाचे आमच्याकडे लक्ष जाईना ! प्रबोधनाकडे सरकारी मेहेरनजर वळविण्याचे पवित्र ब्रा म्हणांचे प्रयत्न जेव्हा अपयशी ठरेल आम्ही निराश झालो.

पण देवाघरचे योगायोग फार कल्पनातीत असतात ! कोठे कशी काय घटना घडेल, याचा नेम नाही, विशेषतः वृत्तपत्रांच्या धंद्यात, संस्थांच्या चळवळीत इलेक्शनच्या हंगामात, कसल्या विषयाला कोणता रंग चढेल,  याचा अंदाज पंचांग बहाद्दरालाही लागणे कठीण ! उपरोक्त निराशेत, नेहमीच्य ा प्रामाणिक मतप्रसाराच्या ‘एकांड्या शिलेदारी ’ उद्योगात मग्न असताना गेल्या आठ तारखेस अवचित पुण्याच्या डि. मॅजिस्ट्रेट साहेबांचे आमंत्रण येऊन थडकले. आनंद वाटला. २ वर्षे दादरला, १ वर्ष सातारा रोडला आणि २ वर्षे पुण्याला प्रबोधनने काढली. या ५ वर्षांत सरकारी आमंत्रणाचा हा पहिला योग. मोठा आनंद वाटला. पण आमंत्रण कोणत्या प्रकरणी ? म्हणून खलिता उघडून पाहतो तो,  ‘भाऊराव पाटील यांचे चरित्र ’ प्रकरणी. आश्चर्य वाटले, मनात म्हटले की हा भाऊराव मोठ्या दैवाचा. याचे चरित्र सरकारनेसुद्धा वाचले, ज्यावेळी वाचायचे त्यावेळी वाचले नाही ; पण आता वाचले. असो. डि. मॅजिस्ट्रेट साहेबांच्या आज्ञेप्रमाणे ता. १२ रोजी १२ वाजता त्यांच्या भेटीस गेलो. साहेब बहादुरांनी १३ मिनिटेपर्यंत मुलाखत दिली. मोकळ्या मनाने विचारविनिमय चर्चा केली. आम्हीही सर्व खुलासा अगदी खुल्या दिलाने करून साहेब बहादुरांची प्रणिपातपूर्वक रजा घेतली. असल्या प्रकारचे विचारविनिमय जर प्रत्येक महत्त्वाच्या बाबतीत घडून येतील. तर गैरसमजुतीचे बरेच निष्कारण कटू परिणाम टळून शासित शास्त्यांतल्या विषमतेला पुष्कळच आळा बसेल, असे आम्हाला वाटले. प्रस्तुत प्रकरणातील आक्षेपार्ह भानगड म्हणजे भाऊराव पाटलांच्या चरित्रलेखात आम्ही अप्रत्यक्षपणे Insinuation असे ध्वनित केले. म्हणतात की भाऊरावांवर पोलिसांनी केलेल्या अत्याचारात कै. शाहू महाराजांचे अंग होते. म्हणजे शाहू महाराजांवर अत्याचाराचा आरोप करीत आहोत. याला आधार तरी कशाचा ? तर खालील कलमाचा- भाऊरावांची अटक केवळ पोलिसी प्रेरणेची होती असे नव्हे, तर त्याची सूत्रे खुद्दांकडून हालत होती, वाटेल ती उलाढाल करून डांबर प्रकरणात लठ्ठांना लोळविण्याचा महाराजांचा निश्चय होऊन बसला होता. मग त्याच्या मागे पोलिसांची कानचावणी असो, नाहीतर लठ्ठ्यांच्या  हितशत्रूंची हातलावणी असो.

यावेळी आमच्यापुढे ओरिएंटल ट्रान्सलेटरचे भाषांतर नाही. परंतु डि. मॅ. साहेबांपुढे ते पाहिलेहोते. त्यात ‘सूत्रे हालत होती ’ याचे भाषांतर ‘वायर पुलींग ’ शब्द कोणत्या अर्थी वापरतात. कोणत्या ठिकाणी लावतात, याचाही भाषाशास्त्रांत काही विवेक आहे. ‘मुंबई इलाख्याची सूत्रे गव्हर्नर साहेबांकडूनच हालत असतात ’ या वाक्याचे ‘The wire-pulling of the Bombay presidency is done by H. E. the Governor’ असे कोणी भाषांतर केल्यास ते कितपत बरोबर होईल ? ‘सूत्र’ म्हणजे  ‘वायर’ आणि ‘सूत्रधार’ म्हणजे ‘ वायर पुलर ’ असे भाषांतर चुकीचे आहे. शिवाय  ‘वायर पुलींग ’ या इंग्रजी शब्दातच एक प्रकारचा ‘बॅड सेन्स ’ (कुत्सित अर्थ) आहे. उपरोक्त कलमात हा शब्द टाकताच खाडकन त्याचा रंग बदलला, अर्थ बदलला आणि लेखकाच्या हेतूचाही विपर्यास झाला. वास्तविक येथे ‘ कंट्रोल’ या क्रियापदाचीच जरूरी आहे आणि ‘ त्याची सूत्रे खुद्दाकडून हालत होती ’ याचे भाषांतर ‘The affair was being controlled by the Maharaja himself.’ असेच करणे प्राप्त आहे. आणि तेच वस्तुस्थितीला धरून होते. कारण ते डांबर प्रकरणच इतके महत्त्वाचे होते की महाराजांवर त्यांच्या हितशत्रूंनी उठविलेल्या इतर गंडांतराच्या अनुभवामुळे, ते तडीला लावण्यासाठी त्यांना स्वतःच सर्व सूत्रावर नजर ठेवून बसणे प्राप्त होते. शब्दयोजना करताना शाहू महाराजांच्या पोझिशनचाही विचार केला पाहिजे. महाराज आपल्या राज्यात स्वयंनिर्णयी स्वतंत्र सत्ताधारी नृपति होते. इच्छामात्रे करून रावाचा रंक व रंकाचा राव करण्याची त्यांची शक्ती होती ? मनात आणतील त्याला फासावर लटकविताना त्यांचा हात धरणारा कोण होता. कोणत्याही गोष्टीत असल्या सर्वसमर्थ छत्रपतीला ‘वायर पुलींग ’ करण्याचे कारणच काय ? अर्थात या भाषांतरीत शब्दयोजनेत विवेक तर नाहीच नाही, पण त्यातील अंतर्भूत ‘बॅड सेन्स ’ मुळे सा-या संदर्भात खोडसाळ घाण उत्पन्न केली. एका शब्दयोजनेचा जर हा प्रताप तर चार फुलस्केप टाईप रिटन भाषांतरात किती गोंधळ असतील ते हरी जाणे ! सारांश भाषांतराची भट्टी म्हणजे एक राजमान्य गंडांतरच होय.

शिवाय मागचा पुढचा संदर्भ विचारात घेऊनच कोणत्याही पुढील मागील वाक्यातून अर्थनिष्पत्ती काढावयाची असते. ‘भाऊरावाची अटक (अत्याचार नव्हे हो !) केवळ पोलिसी प्रेरणेचीच होती असे नव्हे तर त्याची (अटक करण्याची वगैरे) सूत्रे खुद्दाकडूनच हालत होती. ’ इत्यादी वाक्याचा अर्थ लावताना पूर्वीच्या पान ६० वर सुरू झालेल्या कलमातील मजकूर संदर्भार्थ घेतल्याशिवाय कसे भागेल ! ‘या कामी बलिदानासाठी निश्चित ठरविलेल्या अजापुत्राचे जातभाईच जर इतर हितशत्रूंसह अहमहमिकेने पुढ सरसावले, तर चोर सोडून संन्याशाला फाशी द्यायला पोलिसांच्या बापाच काय वेचते ?’ (पृ. ६० रकाना १) या विचाराशी ‘मग त्याच्यामागे पोलिसांची कानचावणी असो, नाहीत लठ्ठ्यांच्या हितशत्रूंची हातलावणी असो ’ (पृ. ६१ रकाना १) हे उद्गार संदर्भात गेतले, तर ‘भाऊरावची अटक केवळ पोलिसी प्रेरणेची नसून लठ्ठ्यांच्या हितशत्रूंच्या चिथावणीचीच होती, हा स्पष्टार्थ साधारण बुद्धीच्या वाचकालाही उमजण्यासारखा आहे.

कोणताही दोष सिद्ध करण्यापूर्वी आरोपीच्या हेतूचेही संशोधन करणे अगत्य असते. गेले १० वर्षांत आमचे प्रसिद्ध वाङ्मय वाचणारे आणि अनेक ठिकाणी झालेली व्याख्याने ऐकलेले हजारो लोक आहेत. गुदस्त साली म. फुले पुण्यतिथी निमित्त याच दिवसात करवीरस्थ हजारो ब्रा म्हण-ब्राम्हणेतर, आबालवृद्ध, स्त्रीपुरुषांना पाच जाहीर व्याख्याच्या द्व ारे आमच्या सर्व विचारांचा स्पष्टास्पष्ट परिचय झालेला आहेच. शाहू महाराजाच्या हितशत्रूंत विशेष प्रमुख वर्ग म्हटला म्हणजे जहाल चित्पावन ब्रा म्हणांचा ही गोष्ट म्हणजे काही नवीन अपूर्व नव्हे. ‘ठाकरे यांनी शाहू महाराजांची बदनामी केली, अशी बातमी कोणी एखाद्या नाजूक आतड्याच्या प्राण्याने एखाद्या कट्टर फत्तर चित्पावनाच्या कानात फुकली, तर तो सुद्धा ‘स्वप्नातही ही गोष्ट खरी मानणार नाही ’ असे धडकावून उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही मग इतरांची काय कथा ?

ठाकरे आणि शाहू महाराज

यांचा परस्पर जिव्हाळ्याचा ऋणानुबंध काय होता आणि ते हयात असताना व दिवंगत झाल्यापासून आजपर्यंत त्यांच्या चारित्र्यावर हल्ले करणारांचा समाचार घेण्यात ठाकरे यांच्या वाणी लेखणीने किती धडाडीच्या टकरा दिलेल्या आहेत. याची पूर्ण जाणीव नसणारा, एकही जहाल भट पत्रकार अवघ्या महाराष्ट्रात औषधाला मिळायचा नाही. इतरांवि षयी गोष्टच नको. १९१६ सालापासून शाहू छत्रपतींवर भिक्षुकी शापांचा ज्या वेळी उघड गुप्त मारा झाला त्या वेळी ठाक-यांच्याच लेखणीने केवळ कोदण्डाचे टणत्कारच नव्हे तर शरवर्षावाचा मुसळधार पाऊस पाडून शाही महाराजांच्या वतीने निकराचा संग्राम केलेला आहे. विजयी मराठा व राष्ट्रवीर या मराठ्यांच्या जबाबदार मुखपत्रांच्या संपादकीय कॉलमांच्या मैदावरूनसुद्धा अनेक महत्त्वाच्या प्रसंगी ठाक-यांचा तो फखाना दणाणलेला आहे. भटी पत्रांतून आणि व्याख्यानातून होणा-या उघड हल्ल्याची गोष्टच काय, पण नुसता चुटपुटता खोडसाळ संदर्भ ( Insinustion) जरी कोठे आढळला तरी त्याचाही यथास्थित समाचार घेण्यास ठाक-यांची लेखणी किती जागरूकतेने आपली छत्रपतिनिष्ठा बजावीत असे, हे बेळगावच्या राष्ट्रवीरातील (२१ मे १९२२) ‘केसरीचा बेशरमपणा ’ या अग्रलेखावरून पडताळून पहावे. मराठ्याचा किंवा ब्रा म्हणेतरांचा वृत्तपत्री ‘आर्टिक्युलेट’ (बोलके) पण ही काल परवाची वाढ आहे. तत्पूर्वी शाहू छत्रपतीवरील नानाविध गंडांतरांच्या प्रसंगी कायस्थी लेखण्याच खर्ची पडलेल्या आहेत आणि त्याची सेवा निष्काम वृत्तीचीच झालेली आहे. ही गोष्ट म्हणजे मोठेसे काही गौप्य नव्हे. याबद्दल सर्वांच्य ा बरोबर ठाकरे यांनीही पु ष्कळ लोकनिंदा व उपहास सहन केलेला आहे व आज करीत आहे. विद्यमान छत्रपती व त्याच्या नव्या प्रभावळीतील नवथर मुत्सद्दी यांना या ऋणानुबंधाची पुसटसुद्धा कल्पना असणे शक्य नाही. तिची त्यांना अटकळही कधी व्हायची नाही. ती व्हावी अशी आमची इच्छाही नाही. जुन्या ऋणानुबंधाचा धागा नव्या मन्वंतराला जोडून स्वार्थाचा किंवा मानमान्यतेचा भिक्षुकी लगा लावून ठेवण्याची भटगिरी आमच्या जातीच्याच रक्तात नसल्यामुळे शाहू महाराजांच्या दुर्दैवी निधनकाळापासून तो आतापर्यंत नवीन छत्रपती किंवा त्याचे नवीन कारभारी यांच्या ‘दर्शनाची’ उठाठेव करण्याच्या फंदात आम्ही मुळीच पडलो नाही. पडण्याची इच्छा नाही. शाहू महाराज गेले, त्यांच्याबरोबर आमच्या ऋणानुबंधाचे परस्पर विश्वासाचे आणि इतर सर्व गोष्टींचे धागेदोरे गेले ! त्याची ओढाताण नवीन पालवीच्या पायरीपर्यंत लाळघोटी कलाच आम्हाला साधलेली नाही, त्याला काय इलाज ?

परंतु व्यक्तिपूजेची एक विचित्र ( crude) भावना आम्हा महाराष्ट्रीयांच्या हाडीमांसी खिळलेली आहे. एखादी व्यक्ती लोकांच्या आदरास पात्र झाली की मग ते त्या व्यक्तीच्या, फक्त गुणांचेच स्तोम माजवितात. आणि दोषावर दाट पांघरूण घालतात. त्यांची पूज्य व्यक्ती म्हणजे त्यांना सकल गुणालंकृत वाटते. कोणी दोषाविष्करण केल्यास त्यांच्या आदराचे नाजूक मानसिक तंतू तात्काळ दुखावतात. मनुष्य म्हणजे गुणदोषांची गोळाबेरीज हे तत्त्व ते साफ विसरतात. ‘Paint me as I am don’t leave even a small scar unpainted’  या ओळीवर क्रॉमवेलच्या उक्तीतील रहस्य त्यांच्य अंध भक्तीला दिसत नाही. उदाहरणार्थ टिळकच घ्या. टिळकांना कोणताही विवेकी प्रतिस्पर्धी क्षुद्र लेखीत नाही. त्यांच्या गुणसमुच्चयाविषयी सर्वत्र आदरच आहे. पण त्यांच्या बडव्यांचे त्यांचे ‘शेषशायी भगवान ’ रूपात प्रदर्शन करताच, प्रतिस्पर्ध्याच्या मनातील आदराचा लंबक थेट अनादराच्या बिंदुकडे खाडकन झोका खातो. टिळकांत जसे बरेच गुण होते, तसे बरेच दोषही होते. पण दोषांचे नावही न काढता गुणाचीच नुसती टाळकुटी आरती करण्याचा टिळकांच्या बडव्यांचा आग्रह कोणाही विवेकी माणसाला किळस आणल्याशिवाय रहात नाही. हीच गोष्ट शाहू भक्तांची होऊ लागली आहे. दोषाविष्कारणानेच गुणांची किंमत असते. हे या आंधळ्या स्तुतिपाठकांना कळणे अवघड आहे.

शाहू महाराजांकडे किंवा कोणाकडे असल्या आंधळ्या भक्तीने पाहण्याची दृष्टी आम्हाला नाही, महाराजांनी तंजावर केससारख्या अनेक भानगडीच्या प्रसंगी आमचा सल्ला घेतलेला आहे. शेकडो बैठकीत नानाविध प्रश्नांवर चर्चा केल्या आहेत. परंतु कोणत्याही मते त्याच्या मुद्यावर त्यांनी आमच्या स्पष्टोक्तीने नाराज होण्याचा राजेपणा दाखविला नाही. महाराज हयात असतानासुद्धा त्यांच्यावर प्रबोधनात दोन तीन वेळा कडक टीका करण्याचा आमच्यावर प्रसंग आला होता. (उदाहरणार्थ ‘अंबाबाईचा नायटा ’ प्रबोधन १-११-१९२१ पहा) पण तेवढ्याने त्यांनी त्यांच्या अंध भक्ताप्रमाणे नाक फेंदारले नाही. उलट आम्हाला पन्हाळा लॉजमध्ये भेटीस बोलावून त्या त्या बाबतीतल्या कारणांची व धोरणांची चिकित्सा केली. शाहू महाराज हयात असताना ज्या प्रबोधनकारांच्या स्पष्टोक्तीत त्यांच्या बदनामीचा, Inuendo, insinuation चा त्यांना वाससुद्धा आला नाही, मतभेदाच्या कडाक्याच्या वादविवादात त्यांना आपली ‘राजकीय इज्जत ’ जखमी झाल्याचा कधी संशय नाही ; एखाद्या बाबतीत आम्ही मौन धरल्यास I say break the ice or I will break your head म्हणून विनोदाने आमच्या स्पष्ट अभिप्रायाला ते व्यक्त करायला लावीत, त्याच शाहू महाराजांविषयी एका सत्य निरूपणाच्या मजकुरात, त्यांच्या मृत्युनंतर, ‘कोणाला तरी ’ पटकन बदनामीचा वास यावा हे बदललेल्या मनुच्या बदललेल्या घ्राणेंद्रियाचेच चिन्ह नव्हे काय ?

इतर एकलकोंड्या संस्थानिकाप्रमाणे शाहू महाराजांच्या चळवळी खास ‘संस्थानी’ नव्हत्या. त्यांच्या राजकारणाचा व्याप कोल्हापुरच्या टीचभर हद्दीत वावरत नव्हता. करवीरस्थ प्रजाजनाचे ते नृपती असले तरी अफाट महाराष्ट्रातल्या बहुजन समाजाचेच ते स्वयंसेवा वृत्तीचे परिच्छिन्न ( recognised) पुढारी होते. त्यांच्या हयातीपर्यंत महाराष्ट्रीय ब्राह्मणेतरांचे नानारंगी राजकारण कोल्हापुरात शिजत असे. त्यावेळी कोल्हापुरविषयी चिमुकली संस्थानी भावना मागे पडून, कोल्हापूर महाराष्ट्राचा रायगड समजला जात असे. अर्थात असल्या सार्वजनिक महाराष्ट्रीय पुढा-याच्या चारित्र्यावर वाटेल त्या दिशेने दृष्टी फेकण्याचा अखिल महाराष्ट्राला पूर्ण अधिकार आहे. अशा वेळी संस्थानिकपणाच्या टीचभर कोंडाळ्यात या महाराष्ट्रव्यापी महापुरुषाच्या चारित्र्याला व चरित्राला कोंबून जरा कोणी कोठे फट् म्हटले की प्रिंसेस प्रोटक्शन एक्टच्या लावावीची धावाधाव करण्याइतका मनाचा मवाळपणा, शाहू महाराजांच्या ‘पावलांवर पाऊल ’ टाकून चालणा-याच्या प्रकृतीत असेल, असा आमची सध्या तरी सूर वाहत नाही. मग जुन्या डोळ्यांना नवीन तमाशे काय काय दिसतील, ते कोणी सांगावे ? 

भाऊराव प्रकरणी कोल्हापुरी पोलिसांकडून घडलेल्या अत्याचाराचा प्रत्यक्षाप्रत्यक्ष आरोप महाराजांकडे जाऊच कसा शकतो ? मथळा तर ‘कोल्हापुरी पोलिसांचे अत्याचार ’ असाच आहे. शाहू महाराजांचे अत्याचार ’ असा नाही. डांबर प्रकरणाचा तपास लावण्याची सर्व सूत्रे खुद्द महाराजांनी जरी हाती ठेवली होती, तरी सर्व लहानसहान गोष्टी ते स्वतःच चोखाळीत होते की काय ? त्यांच्या सत्तेखालच्या सर्व उच्च नीच दर्जाच्या अंमलदारांच्या रिपोर्टप्रमाणे महाराज फक्त हुकूम देण्याचे धनी पर अंमलबजावणी कशी होते, हे त्यांना काय समजणार ? अंमलबजावणीच्या कामी कनिष्ठ अधिका-यांकडून विशेषतः पोलिसांकडून होणारे लहानमोठे त्याचार वरिष्ठ अधिका-यांना आपोआप उमगण्याचे कर्णपिशाच्च यंत्र जर कोणी शोधून काढलेले असते तर कोणत्याही राज्यात अत्याचाराच मागमूसही उरता ना आणि बॅरिस्टर सावरकरांना सुद्धा आपल्या अंदमानच्या हृदयद्रावक कहाण्या प्रसिद्ध करण्याचा प्रसंगच येता ना !

गेल्या वर्षभर केसरीतून प्रसिद्ध होणारी सावरकरांची अंदमान - लेखमाला आणि कित्येक बंगल्यांनी त्याच विषयावर लिहिलेली इंग्रजी पुस्तके प्रसिद्ध होईपर्यंत अंदमानास प्रत्यक्ष यमपुरीपेक्षाही राक्षसी अत्याचाराचा धुडगूस सुरू असतो, अशी कोणाचीही कल्पना नव्हती. पण ती आता या यज्ञातून होरपळून बाहेर पडलेल्या प्रत्यक्ष बळीच्याच तोंडून बाहरे पडल्यामुळे व खुद्द सावरकरांनेही त्या अत्याचाराच्या खोटेपणाचा इन्कार न केल्यामुळे कोणालाही शंका उरत नाही. परंतु ना व्हाईसराय साहेब किंवा स्टेट सेक्रटेरी यांच्या हाती अंदमानची सूत्रे असतात, एवढ्याच सबबीवर, तेथल्या अंमलदाराच्या बेजबाबदार अत्याचाराचे माप कोणी या अधिका-यांच्या पदरात बांधील तर ते कितपत शहाणपणाचे ठरेल ? उलट, अशा वस्तुस्थितीच्या स्पष्ट स्फोटामुळेच व्हाईसरायादी अधिका-यांना अंदमानी परिस्थितीची कसून चौकशी करण्याची प्रेरणा झाली ना ? सत्यस्थितीच्या स्फोटार्थ उपयोगिलेल्या स्पष्टोक्तीचा असाच उपयोग करून घेणे, यालाच राजकारणी न्यायबुद्धी असे म्हणतात, अलिकडे हिंदी वृत्तपत्रांवर सत्ताधा-यांची केवढीही करडी नजर असली, तरी असल्या न्यायबुद्धीला चालना देण्याचे कार्यच ती आपल्या स्पष्टोक्तीने जुळवून आणीत असतात हे विसरून भागणार नाही. सारांश, कोल्हापुरी पोलिसांच्या अत्याचाराचा संबंध महाराजांशी जोडण्याचा अर्थ आमच्या वाक्यातून मुळीच निघत नाही आणि तसा आमचा हेतूही नव्हता व कधी असणारही नाही. महाराजांना या गोष्टी फार मागाहून कळल्या व त्याविषयी काही कडक उपायही त्यांनी योजले होते. अत्याचाराच्या खरे खोटेपणाविषयी शंका निरसनार्थ सावरकराप्रमाणे भाऊराव  पाटील ईश्वलरकृपेने प्रत्यक्ष जिवंत आहेत आणि त्यात महाराजांचा काही संबेध असल्याचे तेही जर म्हणत नाहीत तर आम्ही तरी कोठून विधान करणार. सारांश कोणत्याही दृष्टीने पाहिल्यास आमच्य विधानात शाहू महाराजांच्या चारित्र्याला धक्का देण्याइतके सूक्ष्म अथवा भरीव काहीच नाही मात्र भलत्या कल्पनेची कावीळ झालेल्या डोळ्यां ना सगळा लेखच पिवळा दिसला, तर आम्हापाशी कसलाच उपाय नाही.

तक्रारीचा उगम कोठून ?

या एका मुद्याची शहानिशा केली की आम्ही लेखणी खाली ठेवणार. दि. मॅ. साहेबांना हा प्रश्न आम्ही स्पष्ट विचारला. ते म्हणाले, ‘ओरिएंटल ट्रान्सलेटरकडून हे भाषांतर आलेले आहे. अशा गोष्टी योग्य अधिका-यांच्या नजरेला आणणे हे त्यांचे कर्तव्य आहे. यापलिकडे मला काही माहीत नाही. ’

ओ. द्रॅ. च्या या कर्तव्यक्षमतेबद्दल आम्ही प्रथमच आभार मानून ठेवतो. प्रश्न इतकाच सुचतो की ही त्यांची कर्तव्यदक्षता या एकाच बाबतीत एवढी जागरूक का बनली ? कोल्हापुर संस्थान आणि शाहू महाराज यांची हवी तशी बीभत्स व बेजबाबदार निर्भर्त्सना करण्यात पुण्याच्या भटीपत्रांचा नंबर पहिला आहे. ही त्यांची अनेक वर्षांची परंपरा आहे. अजूनपर्यंत ती अखंड सुरू आहे. नुकत्याच घडलेल्या धनवडी अत्याचाराच्य मागे पुणेरी भटांना दिसणा-या कटातही त्यांनी कोल्हापूरच्या महाराजांना गोवण्याची नातूगिरी केलेली आहे. या सर्व प्रसंगी ओ. द्रा. ने पुण्याच्या डि. मॅ.चे लक्ष वेधण्याची अशीच कर्तव्यदक्षता दाखविली होती काय ? गुदस्त साली सर्रास भटी पत्रातून होळकरांची बीभत्स विटंबना सुरू असताना ओ. द्रा. ने हीच कर्तव्यदक्षता गाजवली होती काय ? देशी संस्थानांची सकारण निष्कारण विटंबना करणा-या किती भटी पत्रकारांना सरकारने आजपर्यंत जाब विचारलेला आहे ? का भटांना सारे खून माफ करण्याचा मनुस्मृती अंमल अजूनही चालूच आहे ? खालसा वृत्तपत्राच्या टिकेपासून देशी संस्थानाचे संरक्षण व्हावे म्हणून प्रिन्सेस प्रोटेक्शन अक्ट नावाचा कायदा अस्तित्वात आहे.

होळकर प्रकरणी या एक्टचा मुंबई सरकारने उपयोग करावा, म्हणून प्रबोधनद्वारा आम्ही अट्टाहासाची अनेक मराठी इंग्रजी आर्टिकल्स खरडली. पण तिकडेही ओ. ट्रा.चे लक्ष गेल्याचे दिसले नाही. पुढे तो एक्ट नीट वाचून पाहता ; ज्या राजावर टीका टिपणी झाली असेल त्यांनी प्रत्यक्ष तक्रार केल्याशिवाय ब्रिटीश सरकार त्या कायद्याचा अंमल करू शकत नाही अशी त्यात मेख आढळली. प्रस्तुत प्रकरणी तशी तक्रार कोल्हापुराकडून झालेली आहे काय ? असा स्पष्ट प्रश्न डि. मॅ. साहेबास विचारता त्यांनी ते मला समजण्यास काही मार्ग नाही असे उत्तर दिले. अर्थात येथेच सारा मार्ग खुंटला. तथापि लेखी नसेल तर तोंडी काहीतरी सूचनेचा प्रकार झाल्याशिवाय ही तक्रार जन्माला आली नसावी खास काहीही असो आणि तक्रार करणारा कोणीही असो ; आम्ही आमचा खुलासा स्पष्टपणे केला आहे. तेवढ्याने कोणाची शंकानिवृत्ती खास होईल, अशी आम्हाला आशा आहे. कोणत्याही बाबतीत प्रमादाक्षमत्वाची ( infallibility) घमेंड आम्ही मारणे शक्यच नाही. ते माणसाला साधत नाही, ते माणुसकीचेही होणार नाही. अर्थात वृत्तपत्रकारांचे सत्यनिरूपणाचे प्रामाणिक कर्तव्य बजावीत असताना एखाद्या शब्दाने, वाक्याने, संदर्भाने किंवा आणखी कशानेही कोणाचीही मनोवृत्ती दुखावली गेली असल्यास केवळ शाहू महाराजांसाठी एक सोडून लाख वेळा दिलगिरी व्यक्त करण्याचा दिलदारपणा ( chivalry) प्रबोधनकारात खास आहे.

Wear Your Face Mask